Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • नसरापूर अत्याचार प्रकरणात आज निर्णय! भीमराव कांबळेला कोर्ट नेमकं काय शिक्षा देणार….
गुन्हा

नसरापूर अत्याचार प्रकरणात आज निर्णय! भीमराव कांबळेला कोर्ट नेमकं काय शिक्षा देणार….

Nasarapur Murder Case
Nasarapur Murder Case: नसरापूर हत्याकांड आणि अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळे याला आज कोर्टात हजर करण्यात येणार असून, सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे. त्याला जन्मठेप की फाशी, याबाबत कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका ६५ वर्षीय वृद्धाने ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आज (सोमवारी, २९ जून) न्यायालय निकाल सुनावणार आहे. या खटल्यातील आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयात शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला फाशी की जन्मठेप, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यायालयाने यापूर्वी आरोपीला २५ जून रोजी दोषी ठरवले असून, सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी अंतिम युक्तिवाद पूर्ण झाले होते. या प्रकरणात सरकारी पक्षाने कठोर शिक्षेची मागणी केली आहे, तर बचाव पक्षाने कमी शिक्षेसाठी युक्तिवाद केला आहे.

हेही वाचा: गिरगावतील हॉटेलवर छापा; संशयित देहव्यापार रॅकेट उघड, ‘या’ अभिनेत्रीला रंगेहात पकडले

तपास आणि सुनावणीचा वेग

घटना घडल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला अटक केली होती. काही दिवसांतच सुमारे १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या खटल्यात ५० हुन अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून, वैज्ञानिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि डीएनए अहवालांचा समावेश करण्यात आला आहे. २१ मेपासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू होती आणि काही आठवड्यांतच खटला अंतिम टप्प्यात पोहोचला.

मागील सुनावणीत काय घडलं?

२५ जून रोजी अंतिम युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी आरोपीला समाजासाठी धोकादायक ठरवत त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. आरोपीला कोणताही पश्चाताप नसल्याचा दावा करत त्याच्या वर्तनावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर बचाव पक्षाने आरोपीचे वय आणि परिस्थितीचा विचार करून जन्मठेपेची शिक्षा योग्य ठरेल असा युक्तिवाद केला होता.

आजच्या सुनावणीकडे लक्ष

आज २९ जून रोजी न्यायालयात शिक्षा ठरवली जाण्याची शक्यता असून, या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने सुनावणीदरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. न्यायालय काय निर्णय देते, यावर या प्रकरणाचा पुढील टप्पा ठरणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts