Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • नसरापूर प्रकरणात मृत्युदंड की जन्मठेप? २९ जूनला होणार अंतिम निर्णय; सरकारी पक्षाची कठोर शिक्षेची मागणी
गुन्हा

नसरापूर प्रकरणात मृत्युदंड की जन्मठेप? २९ जूनला होणार अंतिम निर्णय; सरकारी पक्षाची कठोर शिक्षेची मागणी

Nasrapur Case Sentencing
Nasrapur Case Sentencing: नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याच्या शिक्षेबाबतचा निर्णय २९ जून रोजी जाहीर होणार आहे.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याच्या शिक्षेबाबतचा निर्णय विशेष न्यायालयाने २९ जूनपर्यंत राखून ठेवला आहे. गुरुवारी (२५ जून) पोलीस अधिकारी आणि सरकारी पक्षाच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकरणातील तपास, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेची माहीती दिली.

हेही वाचा: आता तुकाराम मुंढे यांची बदली होणार का नाही? विधानसभेत नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केली भूमिका

Nasrapur Case :

२९ जूनला शिक्षा सुनावणार

सरकारी पक्षाच्या मते, आरोपीविरुद्धचे सर्व आरोप न्यायालयात सिद्ध झाले असून आता केवळ शिक्षेची घोषणा बाकी आहे. २९ जून रोजी विशेष न्यायालय आरोपी भीमराव कांबळे याला शिक्षा सुनावणार आहे.

८२ साक्षीदारांचे जबाब नोंद

सरकारी वकिलांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणात एकूण ८२ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास पूर्ण करण्यात आला. आरोपीला घटनास्थळाशी जोडणारे अनेक वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. (Nasrapur Case Sentencing)

आज युक्तिवाद

सरकारी पक्षाने न्यायालयात युक्तिवाद करताना हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि संवेदनशील स्वरूपाचा असल्याचे नमूद केले. आरोपीने चिमुकलीचे तब्बल ३९ मिनिटे शोषण केल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. तसेच पीडितेच्या मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहावर अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही न्यायालयात मांडण्यात आला. (LS Marathi News Channel)

तपासादरम्यान पीडितेच्या शरीरावर आरोपीचे रक्त आणि लाळ आढळून आल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. याशिवाय चिमुकलीच्या शरीरावर १८ जखमा असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. (Nasrapur Case Sentencing)

गुन्हा पूर्वनियोजित कट रचून करण्यात आला

सरकारी वकिलांच्या मते, हा गुन्हा पूर्वनियोजित कट रचून करण्यात आला असून आरोपीला कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नव्हती. त्यामुळे समाजात कठोर संदेश जाण्यासाठी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली.

दरम्यान, न्यायालयाने आरोपीला शिक्षेबाबत काही सांगायचे आहे का, अशी विचारणा केली होती. मात्र अंतिम निर्णय २९ जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याने आता या प्रकरणात आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा होते की जन्मठेप, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

केतनचा मृतदेह घरी आणताच खटकली ‘ही’ बाब; वडिलांच्या खुलाशाने वाढलं गूढ, नेमकं काय घडलं?

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts