• Home
  • ताज्या बातम्या
  • श्रद्धेच्या आड सुरू होता शोषणाचा खेळ; पुण्यातील आश्रमात नेमकं काय घडत होतं?
गुन्हा

श्रद्धेच्या आड सुरू होता शोषणाचा खेळ; पुण्यातील आश्रमात नेमकं काय घडत होतं?

Pune Wagholi Ashram Case
Pune Wagholi Ashram Case: पुण्यातील वाघोली येथील आश्रमाशी संबंधित धक्कदायक प्रकरण समोर आले असून, श्रद्धा आणि अध्यात्माच्या नावाखाली अत्याचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत स्वयंघोषित गुरूसह आठ जणांना अटक केली. नेमकं काय घडलं आहे जाणून घेऊया.

पुणे पोलिसांनी स्वतःला ‘देवाचा अवतार’म्हणवून घेणाऱ्या एका धर्मगुरू राधामोहन मिश्रा (५९) याला अटक केली आहे. २६ वर्षीय सुशिक्षित महिलेचे अनेक वर्षे लैगिंक शोषण, अमानुष मानसिक छळ आणि आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे.

या प्रकरणात मिश्रा याचा निकटवर्तीय स्वामी कंवल नयन (57) तसेच 6 महिलांसह एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण गुन्हेगारी जाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. (LS Marathi News)

हेही वाचा: पुढील 48 तास महत्त्वाचे, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; जाणून घ्या A टू Z संपूर्ण माहिती

अमानुष छळाचे धक्कादायक आरोप

पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. आरोपीने धार्मिक श्रद्धेचा आधार घेत पीडितेला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली आणले होते. तिला बाबीचे मूत्रपिण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच तिच्यावर मारहाणी करण्यात आली. आणि शॉक देखील देण्यात आले आणि मानसिक छळ करण्यात आला.

याशिवाय, पीडितेला तिच्या पती आणि कुटुंबापासून दूर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तिच्या मालमत्तेवर आणि आर्थिक साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

डॉक्टर वडिलांच्या माध्यमातून कुटूंबात प्रवेश

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेचे वडील डॉक्टर असून मूळचे हरियाणातील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख स्वामी कंवल नयन यांच्याशी झाली होती. त्यांच्याच माध्यमातून हे कुटूंब पंचकुला येथील “गुरूदेव साधना धाम ट्रस्ट” आश्रमाचे प्रमुख राधामोहन मिश्रा यांच्या संपर्कात आले.

मिश्रा यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचा विश्वास कुटूंबाला देण्यात आला. या अंधश्रद्धेचा फायदा घेत आरोपीने कुटूंबात फूट पाडली आणि महिलेचे शोषण केल्याचा आरोप आहे.

आश्रमातील तळघरातून संशयास्पद साहित्य जप्त

या प्रकरणात तपासादरम्यान खराडी पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेने वाघोलीजवळच्या उबाळेनगर येथील एका आश्रमावर छापा टाकला. आश्रमातील तळघरातून मोठ्या प्रमाणात संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.

जप्त साहित्यामध्ये

8 लॅपटॉप आणि 11 मोबाईल फोन
19 हार्ड डिस्क आणि 23 पेन ड्राइव्ह
29 कॅसेट आणि 10 जिवंत काडतुसे
शेकडो औषधे आणि गोळ्यांचा साठा

आणखी महिलाही बळी पडल्याची शक्यता

अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले की, या प्रकरणाची सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे. जप्त केलेली डिजिटल उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत.

प्राथमिक तपासात हे जाळे हरियाणा आणि पुण्यासह इतर ठिकाणीही सक्रिय असल्याचे समोर आले आहे. आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली आणखी अनेक महिला आणि श्रद्धाळूंचे शोषण झाले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या सर्व आठ आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts