Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • परीक्षा न देता मिळणार सरकारी नोकरी! पोस्ट विभागात मेगा भरती जाहीर; वाचा संपूर्ण माहिती
एजुकेशन- जॉब

परीक्षा न देता मिळणार सरकारी नोकरी! पोस्ट विभागात मेगा भरती जाहीर; वाचा संपूर्ण माहिती

India Post GDS Recruitment 2026
29
India Post GDS Recruitment 2026: तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी खास तुमच्यासाठी आहे. भारतीय पोस्ट विभागात तब्बल 23,757 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. चला, जाणून घेऊया या भरतीसाठीची पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धती सविस्तर.

आजच्या काळात वाढती लोकसंख्या आणि स्पर्धेमुळे अनेक तरुण चांगल्या रोजगाराच्या शोधात आहेत. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल (government jobs after 10th) आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. भारतीय पोस्ट विभागाने ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak recruitment) अर्थात GDS पदांसाठी तब्बल 23,757 जागांची भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. दहावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी GDS Notification PDF पाहू शकतात.  (India Post recruitment notification)

हेही वाचा: 7.8% GDP Growth! संकटांच्या काळात भारताने अशी मारली आर्थिक बाजी; पाहा एका क्लिकवर

कोणते पद भरले जाणार आहेत?

या भारतीअंतर्गत ब्रांच पोस्टमास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना वन टाइम रजिस्ट्रेशन म्हणजेच OTR पूर्ण करणे आवश्यक आहे.

या तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू

भरती प्रक्रियेची सुरुवात OTRपासून होणार आहे. उमेदवारांना 31 ऑगस्ट 2026 पासून OTR करता येईल. त्यानंतर 2 सप्टेंबर 2026 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि शुल्क भरण्याची सुविधा सुरू होईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2026 आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावे. ( LS Marathi News Channel )

महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मोठी संधी

देशभरातील विविध पोस्टल सर्कलमध्ये या भरतीद्वारे रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. राज्यनिहाय आकडेवारी पाहता महाराष्ट्रात 2,297 जागा उपलब्ध असून, या भरतीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. (latest government jobs 2026)

इतर राज्यांमध्ये तामिळनाडू 2,118, उत्तर प्रदेश 1,691, पश्चिम बंगाल 1,619 आणि मध्य प्रदेश 1,450 जागा आहेत. याशिवाय झारखंडमध्ये 1,379, केरळमध्ये 1,373, ईशान्य विभागात 1,354, ओडिशात 1,353, कर्नाटकात 1,116 आणि बिहारमध्ये 1,098 पदे भरण्यात येणार आहेत.

पात्रता काय असणार?

GDS भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे. 10वीच्या अभ्यासक्रमात गणित आणि इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे. ज्या राज्यातील किंवा पोस्टल सर्कलमधील पदासाठी अर्ज केला जात आहे, त्या भागातील स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला मूलभूत संगणकाचे ज्ञान असणे आणि सायकल चालवता येणे अपेक्षित आहे. Gramin Dak Sevak recruitment 2026

वयाची अट किती?

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 21 सप्टेंबर 2026 रोजी किमान 18 आणि कमाल 40 वर्षे असावे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि इतर पात्र आरक्षित प्रवर्गांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.

निवड प्रक्रिया

GDS भरतीमध्ये उमेदवारांसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा आयोजित केली जाणार नाही. 10वीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट (GDS merit list 2026) तयार केली जाईल.

गुणांची गणना संगणकीय पद्धतीने करण्यात येणार असून, चार दशांशापर्यंत गुण विचारात घेतले जातील. त्यामुळे 10वीच्या निकालात चांगले गुण मिळवलेल्या उमेदवारांना निवडीची अधिक संधी मिळू शकते.

मेरिटमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम नियुक्ती केली जाईल. (latest government jobs 2026)

उमेदवारांनी काय लक्षात ठेवावे?

ही भरती परीक्षा नसल्यामुळे अर्जदारांची संख्या मोठी असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज करताना शैक्षणिक पात्रता, वय, स्थानिक भाषा आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

आता थोडक्यात सांगायचं तर, १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोस्ट विभागातील २३,७५७ पदांसाठी ही भरती सरकारी नोकरी मिळवण्याची महत्वाची संधी आहे. लेखी परीक्षा नसल्यामुळे दहावीच्या गुणांवर आधारित निवड होणार असून, इच्छुकांनी निर्धारिक वेळेत OTR आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts