India Post GDS Recruitment 2026: तुम्हीही दहावी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण दहावी पास उमेदवारांना आता पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे आणि आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती.
पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक ( GDS)भरती २०२६ च्या जुलै सत्रासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भारतीअंतर्गत पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे.
या भरतीची ऑनलाईन नोंदणी ३१ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे. देशभरातील पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्यापूर्वी ऊमेदवारांनी अधिसूचनेत सर्व नियम आणि पात्रता तपासणे आवश्यक आहे.
हेही वाचा: महिला आशिया कपला आजपासून सुरुवात; ३० ऑगस्टला भारताचा पहिला सामना
महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा
या भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना वन टाइम रजिस्ट्रेशन म्हणजेच OTR प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. OTR साठी 31 ऑगस्टपासून नोंदणी सुरू होणार आहे.
OTR नोंदणी: 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
ऑनलाइन अर्ज सुरू: 2 सप्टेंबर 2026
अर्जाची अंतिम तारीख: 21 सप्टेंबर 2026
अर्जातील दुरुस्ती: 23 ते 24 सप्टेंबर 2026
याची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
GDS भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम इंडिया पोस्टच्या अधिकृत भरती पोर्टलवर जाऊन OTR पूर्ण करावे. त्यानंतर लगेच लॉगिन करून अर्ज करावे.
अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती सादर करावी. लागू असल्यास अर्ज शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत आणि कन्फर्मेशन पेज जतन करून ठेवणे महत्त्वाचे आहे.
कोण करू शकते अर्ज?
या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरू शकतात. उमेदवाराने दहावीच्या अभ्यासक्रमात गणित आणि इंग्रजी विषय घेतलेले असणे आवश्यक आहे. संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही अनिवार्य आहे.
उमेदवाराचे वय अर्जाच्या नियमांनुसार 18 ते 40 वर्षे असणे अपेक्षित आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळू शकते.
परीक्षा न देता होऊ शकते निवड
या भरतीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे GDS पदांसाठी उमेदवारांची निवड दहावीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत उमेदवाराला मिळालेल्या गुणांच्या आधारे सिस्टमद्वारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या यादीच्या आधारे पात्र उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक आणि इतर आवश्यक कागदपत्रांची विभागाकडून पडताळणी केली जाऊ शकते. यासाठी डिजिलॉकर, API सेतू किंवा संबंधित शिक्षण मंडळाच्या अधिकृत प्रणालीचा वापर होऊ शकतो.



