Top News

अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसला आग; ऐन दिवाळीत रेल्वेसेवा विस्कळीत

चाणक्य नीति यश मिळवण्यासाठी एकजुटीने काम करणे गरजेचे समजून घ्या चाणक्य नीति चे सिद्धांत 2

नवी दिल्ली : शनिवारी सकाळी पंजाबमधील अमृतसरहून बिहारमधील सहरसा इथं जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेस ट्रेनला आग लागली, ज्यामुळं प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकावर 12204 अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागली. ही घटना सकाळी 7:30 वाजता घडली. या आगीत ट्रेनचे दोन किंवा तीन एसी डबे जळाल्याचं वृत्त आहे. आगीत एक महिलाही भाजल्याचं वृत्त आहे, मात्र याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

अनेक प्रवासी जखमी :

सुरुवातीच्या वृत्तानुसार, लुधियानाहून अनेक व्यावसायिकांना घेऊन जाणाऱ्या कोच क्रमांक 19 मध्ये शॉर्ट सर्किटमुळं आग लागली. लोको पायलटनं आपत्कालीन ब्रेक लावले आणि ट्रेन थांबवली. गोंधळाच्या दरम्यान प्रवासी त्यांच्या सामानासह ताबडतोब ट्रेनमधून उतरले. उतरताना अनेक प्रवासी जखमी झाले. माहिती मिळताच रेल्वे आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. यानंतर तासाभरात आग आटोक्यात आणण्यात आली.

 

कोणतीही जीवितहानी झालेली नाही :

रेल्वे मंत्रालयानं सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई केली आणि प्रवाशांना इतर डब्यांमध्ये हलवलं आणि आग त्वरित विझवण्यात आली. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ट्रेन लवकरच तिच्या गंतव्यस्थानाकडे रवाना होईल. रेल्वेनं दावा केला आहे की आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचं म्हणणं आहे की पळून जाताना अनेक लोक जखमी झाले.

हे हि वाचाIRCTC वेबसाइट आणि अ‍ॅप बंद, तत्काळ तिकिटं बुक करता आली नाही; दिवाळीसाठी तिकिटं बुक न झाल्यानं प्रवाशांचा रेल्वेमंत्र्यांवर संताप

आग आटोक्यात :

रेल्वे मंत्रालयानं ट्रेनला लागलेल्या आगीची पुष्टी केली आहे. शनिवारी सकाळी सरहिंद स्टेशनवर अमृतसर-सहरसा ट्रेन क्रमांक 12204 च्या एका डब्यात आग लागल्याचं मंत्रालयानं सांगितलं. मात्र यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्यात आली आहे. परंतु आगीमुळं इतर अनेक गाड्यांवरही परिणाम झाला. सुमारे एक तासानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरु झाली. आगीचं कारण सध्या तपासाधीन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts