शैक्षणिक बातम्या

आता शाळेची घंटा बदलणार? BLO शिक्षकांसाठी शिक्षण विभागाचा नवा आदेश

BLO Teachers

BLO Teachers: आता शाळेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. BLO म्हणून नियुक्त शिक्षकांना मतदार पुनरिक्षणाचे काम सुरळीत करता यावे, यासाठी शिक्षण विभागाने शाळांना विशेष नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

मतदार यांद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या जबाबदाऱ्या अधिक परिणामकारकपणे पार पाडता याव्यात, यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना महत्वाचे निर्देश जारी केले आहेत.

विभागाच्या आदेशानुसार ३० जुलै २०२६ पर्यंत BLO म्हणून नियुक्त शिक्षकांवरील अध्यापनाचा भार शक्य तितका कमी ठेवण्याचे नियोजन करावे. त्यांच्या अध्यापनाच्या तासिका सलग ठेवून, शक्य असल्यास शाळांचे कामकाज सकाळच्या सत्रात आयोजित करण्याची सूचना देण्यात आली आहे. या बदलामुळे शिक्षकांना शालेय अध्यापन पूर्ण केल्यानंतर उर्वरित वेळेत मतदार पुनरिक्षणाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडणे सुलभ होणार आहे.

हेही वाचा: ऐन परीक्षेच्या तोंडावर पावसाचा अडथळा; आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ९ जुलैच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

याशिवाय, BLO म्हणून नियुक्त नसलेल्या शिक्षकांनी आवश्यकतेनुसार संबंधित शिक्षकांना शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामात सहकार्य करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा प्रमुखांनी कामाचे नियोजन करताना BLO शिक्षकांवर अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा भार पडणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश

शिक्षण विभागाने या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितले असून, प्रत्येक शाळेने केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल विहित नमुन्यानुसार निश्चित मुदतीत संबंधित कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
image 750x 6a4e58cdc6306

२४ वर्षांनंतर विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल

दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने जवळपास २४ वर्षांनंतर विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) सुरू केले आहे. या व्यापक मोहिमेसाठी राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, कंत्राटी कर्मचारी तसेच शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत मतदार याद्या अद्ययावत व अचूक करण्यासाठी BLO यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर

या संदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी संबंधित शाळांना आवश्यक कार्यवाही करण्यासाठी परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार सर्व शाळांनी तातडीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts