MPSC Talathi Recruitment 2026: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. MPSC ने तलाठी भरतीची घोषणा केली असून, अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, परीक्षा कधी होणार आणि इतर सर्व महत्त्वाची A टू Z माहिती येथे जाणून घ्या.
राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ संदर्भातील सुधारित अधिसूचना प्रसिद्ध केली असून, आता या भरती प्रक्रियेत एकूण ५,७०७ रिक्त पदांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये १५३९ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांचाही समावेश असल्याने उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 5 ऑगस्ट 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) शेवटची तारीख आहे.
एकूण किती पदांसाठी होणार भरती?
सुधारित जाहिरातीनुसार आता विविध विभागांतील अनेक पदे या भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रमुख पदे पुढीलप्रमाणे आहेत.
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – 1,539 पदे
वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक – 11 पदे
सहायक अधीक्षक – 11 पदे
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) – 254 पदे
नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा कार्यालयातील पदे – 230 पदे
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग – 155 पदे
आदिवासी विकास विभाग – 69 पदे
लिपिक-टंकलेखक (महसूल व वन विभाग) – 480 पदे
लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग) – 339 पदे
याशिवाय इतर काही पदांचाही या भरतीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
शैक्षणिक पात्रता
तलाठी, वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) पदासाठी B.F.Sc. (Bachelor of Fisheries Science) पदवी अनिवार्य आहे.
लिपिक- टंकलेखक पदांसाठी पदवीसोबत शासनाने मान्य केलेली टंकलेखन पात्रता आवश्यक राहील.
परीक्षा कधी होणार?
MPSC च्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 25 ऑक्टोबर 2026 रोजी ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 5 ऑगस्ट 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 8 ऑगस्ट 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
अर्ज कसा कराल?
उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/home वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
प्रथम नवीन उमेदवारांनी नोंदणी (Registration) पूर्ण करावी.
आधीपासून नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉगिन करून ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ हा पर्याय निवडून अर्ज भरावा.
अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.
राज्यातील महसूल विभागात नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी मानली जात आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.



