AAI Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज कसा करावा चला तर जाणून घेऊयात.
विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची संधी मानली जात आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (Airport Authority of India Recruitment) ने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून, या माध्यमातून एकूण 379 उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना देशातील विमानतळ व्यवस्थापन आणि संबंधित विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया 8 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा: पिंपल्सपासून ग्लोइंग स्किनपर्यंत! तमन्ना भाटियाने सांगितले खास ब्युटी सीक्रेट; जाणून घ्या रुटीन
कोणत्या पदांसाठी होणार भरती? (AAI Recruitment 2026)
या भरतीमध्ये ग्रुप- A अंतर्गत मॅनेजर आणि ग्रुप- B अंतर्गत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांचा समावेश आहे. मॅनेजर पदांसाठी विविध विभागांमध्ये रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, फायनान्स, ऑपरेशन्स, इलेक्ट्रिकल, फायर सर्व्हिसेस, आयटी, लॉ, आर्किटेक्चर आणि विभागांचा समावेश आहे. तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ऑपरेशन्स, फायनान्स , सर्व्हे आणि कार्टोग्राफी तसेच लॉ विभागात संधी उपलब्ध आहेत.
पात्रता आणि वयोमर्यादा
या भारतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे. प्रत्येक पदासाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत.
वयोमर्यादेबाबत
मॅनेजर पदासाठी कमाल वय ३२ वर्षे आहे.
ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी कमाल वय २७ वर्षे आहे.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क किती?
सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासाठी १००० रुपये शुल्क भरावे लागेल.
तर SC, ST, दिव्यांग उमेदवार, महिला उमेदवार आणि AAI मध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण केलेल्या उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
पगार किती मिळणार?
AAI मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना आकर्षक वेतनासोबत विविध भत्त्यांचा लाभ मिळणार आहे.
मॅनेजर पदासाठी वेतनश्रेणी ६०,००० रुपये ते १,८०,००० रुपये इतकी आहे.
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी वेतनश्रेणी ४०,००० रुपये ते १,४०,००० रुपये आहे.
याशिवाय कंपनीच्या नियमानुसार इतर सुविधाही मिळणार आहेत.
निवड प्रक्रिया कशी असेल? (AAI Recruitment 2026)
उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा (CBT) च्या माध्यमातून केली जाईल. परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंगची तरतूद नसल्याचे सांगण्यात आले आहे.
परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाईल. काही पदांसाठी मुलाखत, शारीरिक चाचणी किंवा ड्रायव्हिंग टेस्ट देखील घेतली जाऊ शकते.
अर्ज कुठे करायचा?
पात्र उमेदवारांना AAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
वेबसाइटवरील Career सेक्शनमध्ये भरतीशी संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.









