• Home
  • Top News
  • अर्ज केला नाही? तर करा घाई! IBPS PO भरतीसाठी आज शेवटची संधी
शैक्षणिक बातम्या

अर्ज केला नाही? तर करा घाई! IBPS PO भरतीसाठी आज शेवटची संधी

IBPS PO Recruitment 2026
IBPS PO Recruitment 2026: IBPS PO भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार आहे. दरम्यान, IBPS ने सुधारित रिक्त पदांची संख्या जाहीर करत PO भरतीतील जागांमध्ये मोठी वाढ केली आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने २० जुलै रोजी सुधारित रिक्त पदांची यादी प्रसिद्द केली. त्यानुसार PO भरतीतील पदसंख्या ६,७१५ वरून ७,३६५ इतकी करण्यात आली असून ६५० नवीन पदांची भर घालण्यात आली आहे.

तसेच स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) भरतीतील रिक्त जागा ७४५ वरून १,०३५ करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही भारतींमध्ये मिळून ९४० अतिरिक्त पदे वाढली असून एकूण ८,४०० पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

हेही वाचा: ‘२० जुलै हा डरपोक दिवस म्हणून जाहीर करावा’; विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

कोणत्या बँकेत किती पदे?

माहितीनुसार, सर्वाधिक पदे बँक (Bank Jobs 2026) ऑफ बडोदामध्ये आहेत. त्यानंतर कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांनीही मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे जाहीर केली आहेत.

दरम्यान, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांनी अद्याप त्यांच्या रिक्त जागांची माहिती सादर केलेली नसल्याने भविष्यात पदसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Education latest News)

प्रवर्गनिहाय पदांचे वाटप

सुधारित यादीनुसार सामान्य, ओबीसी, एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस या सर्व प्रवर्गांसाठी स्वतंत्र पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठीचे आरक्षण संबंधित प्रवर्गांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

अर्जासाठी आवश्यक पात्रता

PO पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. १ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षांदरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

हेही वाचा: मुंबईकरांनो लक्ष द्या! ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; काय बंद, काय सुरू? जाणून घ्या कधीपासून सुरू होणार

निवड प्रक्रिया कशी असेल? (selection process)

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, व्यक्तिमत्त्व चाचणी आणि मुलाखत या टप्प्यांद्वारे केली जाणार आहे. प्राथमिक परीक्षा २२ आणि २३ ऑगस्ट रोजी होणार असून, मुख्य परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित आहे.

अर्जासाठी आजच शेवटचा दिवस

IBPS PO आणि SO भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ जुलै आहे. (Eligibility Criteria for IBPS PO Recruitment) इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्ज शुल्क भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts