• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • NEET परीक्षा २०२७ पासून होणार “ऑनलाईन” पद्धतीने; यंदा फेरपरीक्षेत विद्यार्थ्यांना १५ मिनिटे एक्सट्रा टाईमही मिळणार
ताज्या बातम्या

NEET परीक्षा २०२७ पासून होणार “ऑनलाईन” पद्धतीने; यंदा फेरपरीक्षेत विद्यार्थ्यांना १५ मिनिटे एक्सट्रा टाईमही मिळणार

neet exam 2026

NEET Re-exam 2026: नीट परीक्षेबाबत शिक्षणमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. यंदाची फेरपरीक्षा २१ जून २०२६ रोजी होणार असून २०२७ पासून परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

NEETUG परीक्षेतील कथित गैरव्यवहारांनंतर केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, २१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त १५ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. तसेच २०२७ पासून नीट परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

हेही वाचा: यावर्षी अधिक मास कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या धार्मिक महत्त्व, नियम आणि काय करावे-काय टाळावे

सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेनंतर काही प्रश्नपत्रिकांबाबत संशय निर्माण झाला होतो. प्राथमिक चौकशीत पेपर लीक आणि गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला असून तपास यंत्रणांनी कारवाई सुरू केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या घोषणा

२१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेत विद्यार्थ्यांना १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार
विद्यार्थ्यांना देशातील कोणतेही परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा
रद्द झालेल्या परीक्षेचे शुक्ल परत केले जाणार
प्रवेशच्या दिवशी वाहतुकीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्याची तयारी
२०२७ पासून neet परीक्षा ऑनलाइन मोडमध्ये आयोजित केली जाणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts