Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ‘चला हवा येऊ द्या’ला निलेश साबळेंचा टाटा-बाय बाय! आगामी सिनेमाबाबत केला मोठा खुलासा
मनोरंजन

‘चला हवा येऊ द्या’ला निलेश साबळेंचा टाटा-बाय बाय! आगामी सिनेमाबाबत केला मोठा खुलासा

Nilesh Sable New Movie
24
Nilesh Sable New Movie: ‘चला हवा येऊ द्या’ मधून घराघरात पोहोचलेले निलेश साबळे आता नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या आगामी प्रोजेक्टबाबत त्यांनी नुकताच मोठा खुलासा केला असून, सिनेमात ‘चला हवा येऊ द्या’ छाप दिसणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘चला हवा येऊ द्या’ ( Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे निलेश साबळे सध्या नव्या सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहेत. कार्यक्रमाच्या नव्या पर्वापासून दूर राहिल्यानंतर निलेश साबळे (Nilesh Sable) कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांसमोर येणार, याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता होती. आता या प्रश्नाचं उत्तर खुद्द निलेश साबळे यांनी दिलं आहे.

नुकत्याच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आगामी सिनेमाविषयी अनेक महत्त्वाचे खुलासे केले. या सिनेमाचं जवळपास 80 टक्के शूटिंग पूर्ण झालं असून, सध्या पावसामुळे चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.

हेही वाचा: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींच्या करिअरपासून आर्थिक स्थितीपर्यंत होणार सुधारणा

नव्या सिनेमासाठी मोठं आव्हान

सिनेमा बनवणं जितकं महत्वाचं आहे. तितकंच प्रेक्षकांना तो थिएटरमध्ये पाहण्यासाठी आकर्षिक करणंही गरजेचं असल्याचं निलेश (Nilesh Sable) यांनी सांगितलं. आजच्या काळात टिझर आणि ट्रेलर पाहिल्यानंतरच अनेकदा प्रेक्षक सिनेमा पाहण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे आपल्या सिनेमासमोर हे मोठं आव्हान असल्याचं ते म्हणाले.

मात्र, या प्रयोगाबाबत निलेश साबळे (Nilesh Sable) यांना पूर्ण विश्वास आहे. कोणतीही घाई न करता प्रेक्षकांना आवडेल अशा पद्धतीने सिनेमा तयार करण्यावर त्यांचा भर आहे.

37 कलाकार एकाच सिनेमात

या सिनेमाची सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे मराठी मनोरंजनविश्वातील अनेक अनुभवी कलाकार यात एकत्र दिसणार आहेत. जवळपास 37 कलाकार या सिनेमाचा भाग असल्याची माहिती निलेश (Nilesh Sable) यांनी दिली. विशेष म्हणजे, कलाकारांची संख्या भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. ( LS Marathi News Channel )

दिग्गज कलाकारांचा अनुभव आणि त्यांच्या कामाची समृद्ध पार्श्वभूमी या सिनेमासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचं निलेश यांनी सांगितलं. त्याचबरोबर सिनेमाची कथा नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘चला हवा येऊ द्या’ची स्टाईल दिसणार नाही

निलेश साबळे (Nilesh Sable) म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर ‘चला हवा येऊ द्या’मधील विनोद आणि त्यांची खास शैली येते. त्यामुळे आगामी सिनेमातही त्याच प्रकारचा कंटेंट पाहायला मिळणार का, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. (Marathi Film News)

मात्र, निलेश (Nilesh Sable) यांनी याबाबत कोणतीही संदिग्धता ठेवलेली नाही. त्यांचा आगामी सिनेमा ‘चला हवा येऊ द्या’च्या शैलीतला नसणार आहे. कार्यक्रमाची आणि सिनेमाची मांडणी पूर्णपणे वेगळी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. (Nilesh Sable Upcoming Movie)

जर सिनेमातही ‘चला हवा येऊ द्या’सारखाच (Chala Hawa Yeu Dya) अनुभव दिला, तर प्रेक्षकांना त्यात नवीन काय मिळणार, असा त्यांचा मुद्दा आहे. त्यामुळे आपल्या लोकप्रिय कार्यक्रमाची शैली मोठ्या पडद्यावर तशीच आणण्याऐवजी काहीतरी नवीन सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

आता सिनेमाची अधिकृत घोषणा कधी? (Marathi Cinema)

सिनेमाचं बहुतांश शूटिंग पूर्ण झाल्यामुळे लवकरच त्यासंदर्भातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या पावसामुळे शूटिंगला ब्रेक असला तरी प्रोजेक्टचं काम सुरू आहे.

निलेश साबळेंचा हा नवा प्रयोग प्रेक्षकांना किती पसंत पडतो, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, मोठी स्टारकास्ट, वेगळा विषय आणि ‘चला हवा येऊ द्या’पेक्षा पूर्णपणे वेगळं काही देण्याचा प्रयत्न यामुळे या सिनेमाने आत्तापासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts