Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • शिल्पा शेट्टीच्या क्लबमध्ये तरुणांचे अश्लील चाळे? व्हिडिओ व्हायरल होताच वाद पेटला; नेमकं प्रकरण काय?
मनोरंजन

शिल्पा शेट्टीच्या क्लबमध्ये तरुणांचे अश्लील चाळे? व्हिडिओ व्हायरल होताच वाद पेटला; नेमकं प्रकरण काय?

Shilpa Shetty
73

Shilpa Shetty Club Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी संबंधित एका क्लबबाबत चर्चा रंगली आहे. पुण्यातील एका उच्चभ्रू नाईट क्लबमध्ये घडल्याचा दावा केला जाणारा हा प्रकार सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. नेमकं काय प्रकरण जाणून घेऊयात

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मोठ्या संगीतासह डान्स फ्लोअरवर गर्दी दिसत आहे. या दरम्यान काही तरुण- तरुणी सार्वजनिक ठिकाणी आरोग्य वर्तन करत असल्याचे दावे केले जात आहेत. व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर अनेकांनी यावर तीव प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: RCC क्लासेसची फी आणि सुविधा काय आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती

क्लब आणि नाईटलाइफवर प्रश्नचिन्ह

ही घटना समोर आल्यानंतर पुण्यातील नाईट क्लब संस्कृती आणि पब संस्कृतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या वर्तनामुळे सामाजिक माध्यमांवर संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिकांची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर अनेकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत प्रशासनाने याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. काही नागरिकांनी तर अशा घटनांमुळे तरुण पिढीवर चुकीचा प्रभाव पडू शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे.

तपासाची मागणी

या प्रकरणाची सत्यता आणि व्हिडिओचा स्रोत याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. तरीही या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts