• Home
  • राजकारण
  • काही क्षणात सर्वांचे लाडके अजित दादा अनंतात विलीन होणार
Top News

काही क्षणात सर्वांचे लाडके अजित दादा अनंतात विलीन होणार

website vijaya 31

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य हालहाल व्यक्त करत आहे. आता दादांना निरोप देण्याची वेळ आली असून राज्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे पवार कुटुंबीय उपस्थित आहे. अजित दादांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले असून काही क्षणात लाडक्या दादांना मुखाग्नी देण्यात येणार असून दादा अनंत विलीन होणार आहे.

यावेळी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार, दोन्ही मुले, भगिनी आणि आई आशाताई यांचा समावे होता. दिवसाचे 16-17 तास काम करणारे नेतृत्व अशी त्यांची ख्याती होती. सहा वेळा उपमुख्मंत्री म्हणून काम केलेले अजित पवार त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने दिल्ली गाठली. शेतकऱ्यांच्या संवेदना त्यांनी जाणून घेतल्या. प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न जाणून घेण्याचोई आणि त्या प्रश्नांवर सोल्युशन काढून ते सोडवण्यासाठी ते धडाडीने त्यांचे कार्य करत असत. त्यांनी दिलेला शब्द ते पाळायचे म्हणजे पाळायचे.

काल बारामतीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या 4 सभा होत्या. या सभेसाठीच मुंबईतील सर्व कामे उरकून दादा बारामतीला निघाले होते. बारामतीत लँडिंग करतानाच 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात घडला. हा अपघात बारामती एअरपोर्टहून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर घडला. ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवर लँड करता आले नाही.

काही वेळात अजित दादा अनंतात विलीन होणार आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमध्ये असलेल्या काटेवाडी याठिकाणी असलेल्या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले असून अंतिम दर्शनासाठी सर्व राजकीय नेते उपस्थित झाले असून काही क्षणात विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित दादांना शेवटचा निरोप देण्यात येणार आहे.

राजकीय वर्तुळात अजित दादा गेल्याने शोककळा पसरली असून बारामती आणि केतकवाडी परिसरातुन आलेल्या दादांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली आहे. अंत्यसंस्कारावेळी कार्यकर्त्यांकडून दादा अमर रहे, अजित दादा अमर रहे अशा घोषणा देण्यात येत असून संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला आहे. परिसरात जमलेली अथांग जनसमुदायाच्या गर्दी हीच दादांच्या कामाची पावती ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts