• Home
  • राजकारण
  • अजितदादांचे विश्वासू प्रमोद हिंदूराव मोठं वक्तव्य; “अजितदादा प्लेनने नाही, बायरोड जाणार होते”
Top News

अजितदादांचे विश्वासू प्रमोद हिंदूराव मोठं वक्तव्य; “अजितदादा प्लेनने नाही, बायरोड जाणार होते”

Ajitdada was going to go by road not by plane

Ajitdada was going to go by road not by plane : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्याचा मृत्यूविषयी अनेक लाेक संशय व्यक्त करीत आहे. कल्याणमध्ये अजित पवार यांच्या शोक सभेत राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव यांनी एक वक्तव्य केले आहे. अजित दादा हे बायरोड जाणार होते. मात्र प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला. त्यांची कोणती तरी फाईल मंत्रालयात आहे. त्यावर सही करायची आहे. दादा यांनी फाईल मागिवली. मात्र त्यांना उशिर झाला. त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी प्लेनने गेले. प्रमोद हिंदूराव यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – गुलाबांना ‘व्हॅलेंटाइन डे निमित्त’ आंतरराष्ट्रीय मागणी, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपघाती मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त करीत प्रश्चचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित केली. प्रश्नांची सरबत्ती केली. आत्ता अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदूराव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एक फेब्रुवारी २०१६ चा आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीने शोकसभा कल्याणमध्ये आयोजित केली गेली. या शोकसभेत प्रमोद हिंदूराव यांनी अनेक आठवणी दादांच्या सांगितले. त्यांनी एक वक्तव्य केले. अजित दादा यांच्या दैनंदिन वेळापत्रक येत होते. अपघाताच्या एका दिवसाआधी त्यांनी त्यांच्या सुरक्षाकाला चार ते पाच बॅगा गाडीत ठेवण्यास सांगितली. ते बायरोडने जाणार होते. मात्र प्रफुल्ल पटेल यांचा एक फोन आला. मंत्रालयात त्यांची कोणीती तरी फाईल थांबली आहे. त्यावर सही पाहिजे. दादांनी मंत्रालयातील व्यक्तीला फाईल आणालया सांगितले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीमुळे सात-आठ दिवस अजितदादा मुंबईत नाहीत. त्यामुळे ती फाईल आणायला सांगितली. फाईल येण्यास उशिर झाला. त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी प्लेनने गेले. या बाबत प्रमोद हिंदूराव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याचा फोन बंद आहे. ते घरी नाहीत. हिंदूराव हे मुंबईला निघून गेल्याचे त्यांच्या घरच्या लोकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts