• Home
  • ताज्या बातम्या
  • अमरनाथ यात्रा लवकरच; ‘या’ तारखेपासून नोंदणी करता येणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Top News

अमरनाथ यात्रा लवकरच; ‘या’ तारखेपासून नोंदणी करता येणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Amarnath Yatra 2026

Amarnath Yatra Registration 2026: यंदा अमरनाथ यात्रा ३ जुलै २०२६ पासून प्रारंभ होणार आहे. चला तर जाणून घेऊयात यासाठी नोंदणी प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुंफा येथे होणारी वार्षिक अमरनाथ यात्रा यंदा ३ जुलैपासून ते २८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावर्षी ही यात्रा एकूण ५७ दिवसांची असेल.

ही माहिती जम्मू- कश्मीर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. यात्रेच्या तारखा श्री अमरनाथजी श्राईन बोर्डच्या बैठकीत निश्चित करण्यात आल्या. यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य असून ती १५ एप्रिलपासून सुरू होईल. १३ ते ७० वयोगटातील भक्त किंवा यात्रेकरू यात सहभागी होऊ शकतील. अधिक माहितीसाठी तुम्ही travelmykashmir.com या अधिकृत वेबसाईट वर जाणून अर्ज करू शकता.

हेही वाचा: रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा आज शिर्डी पोलिस ठाण्यात हजर, खरात प्रकरणात चौकशी सुरू

बँक शाखांमधून नोंदणी

भाविकाना देशभरातील सुमारे ५५६ बँक शाखांमधून नोंदणी करणार आहे. तसेच, ऑनलाइन नोंदणी केवळ अधिकृत वेबसाइटवरच उपलब्ध आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि येस बँकेच्या शाखांमध्ये ही सुविधा दिली जाईल.

पहिली पूजा १९ जून रोजी, यात्रापूर्वीच्या दिवशी, ‘ज्येष्ठ पौर्णिमे’निमित्त केली जाईल.

यंदाही यात्रा दोन मार्गांनी जाईल. अनंतनाग जिल्ह्यातील पारंपरिक पहलगाम मार्ग (सुमारे ४८ किमी) आणि गांदरबल जिल्ह्यातील लहान पण अधिक कठीण बाल्टाल मार्ग (सुमारे १४ किमी).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts