• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • थरारक घटना! फारूख अब्दुल्ला यांच्यावर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला, गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल
Top News

थरारक घटना! फारूख अब्दुल्ला यांच्यावर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला, गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल

farooq abdulla

Farooq Abdullah Firing | जम्मू-काश्मीरचे (Jammu Kashmir) माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला (Farroq Abdullah) यांच्यावर जीवघेणा हल्ला घाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. बुधवारी रात्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर एक लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला झाला. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला असून संपर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – PM Modi: X आणि Instagram वरून डिलिट केले PM मोदींवरील टीकात्मक पोस्ट; कंटेंट हटवण्यावरून नवा वाद सुरू

जम्मूतील ‘ग्रेटर कैलास’ येथील रॉयल पार्क येथे हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत फारूख अब्दुल्ला यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, मात्र, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG)च्या कमांडोनी दाखवलेल्या तप्तरतेमुळे फारूख अब्दुल्ला यांचे सुदैवाने प्राण वाचले. या हल्ल्यातून फारूख अब्दुल्ला थोडक्यात बचावले आहेत.

लग्नसमारंभात नेमकं काय घडलं?

‘ग्रेटर कैलास’ येथील रॉयल पार्क येथे फारूख अब्दुल्ला एका लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्नसमारंभ झाल्यानंतर ते तेथून बाहेर पडत असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. फारूख अब्दुल्ला यांच्या मागेच हल्लेखोर होता. त्यामुळे हल्लेखोराने त्यांच्या जवळ जात त्यांच्यावर पिस्तूल ताणली आणि गोळी झाडली. पण, तप्तरता दाखवत एनएसजी कमांडोंनी हल्लेखोराला जोरात धक्का दिला ज्यामुळे गोळीचा निशाणा चुकला. या हल्ल्यात अब्दुल्ला फारूख थोडक्यात बचावले आहेत. तर या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

फारूख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखार नेमकं काय म्हणाला?

फारूख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोराला उपस्थित लोकांनी पकडले. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. कमल सिंग जमवाल (65 वय) असे या हल्लेखोराचे नाव असून तो मुळचा जम्मूच्या पुरानी मंडी येथील आहे. अटक केल्यानंतर “मी मागील 20 वर्षांपासून या संधीची वाट पाहत होतो”, असं आरोपीने म्हटलं आहे. तर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी कमल सिंग जमवालच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता.

जेव्हा फारूख अब्दुला यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार नासिर अस्लम वानी हे देखील उपस्थित होते. तर या घटनेनंतर जम्मूमध्ये तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान, अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर जम्मूमध्ये ताणावाचे आणि संतापाचे वातावरण आहे. तर या धक्कादायक हल्ल्यानंतर या घटनेबाबत सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपास केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts