Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Yoga for Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग रोज करा ही 5 योगासनं अन् मिळवा अनेक फायदे
ताज्या बातम्या

Yoga for Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग रोज करा ही 5 योगासनं अन् मिळवा अनेक फायदे

Yoga for Heart Health

5 Best Yoga Poses to Keep Your Heart Healthy: हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि संतुलित जीवनशैली महत्वाची असते. योगातील काही सोपी आसन जर रोज केल्यास रक्ताभिसरण सुधारते, तणाव कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. अशाच 5 प्रभावी योगासणांविषयी जाणून घेऊया.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदयाचे आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक झाले आहे. तणाव, चुकीचा आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हृदयाशी संबंधित समस्या वाढताना दिसतात. अशा परिस्थितीत योगाचा नियमित सराव केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यास मदत होते. काही सोपी योगासनं आणि श्वसनाच्या क्रिया केल्यास रक्ताभिसरण सुधारते, तणाव कमी होतो आणि हृदय अधिक मजबूत राहू शकते.

ताडासन

ताडासन हे दिसायला सोपे असले तरी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. या आसनात शरीर सरळ ठेवून उभे राहिल्याने छाती खुलते आणि श्वास घेणे सुलभ होते. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो आणि हृदयावरचा ताण कमी होण्यास मदत होते.

वृक्षासन

वृक्षासन केल्याने शरीराचे संतुलन आणि एकाग्रता वाढते. एका पायावर उभे राहून शरीर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे स्नायू सक्रिय होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. नियमित सरावामुळे मन शांत राहते आणि तणाव कमी होतो, ज्याचा सकारात्मक परिणाम हृदयावर दिसून येतो.

पादहस्तासन

या आसनात शरीर पुढे झुकवले जाते, ज्यामुळे शरीराच्या वरच्या भागात रक्तप्रवाह वाढतो. यामुळे मेंदू आणि हृदयाला अधिक रक्तपुरवठा मिळतो. हा सराव केल्याने शरीर रिलॅक्स होते आणि तणाव कमी होण्यास मदत मिळते.

हस्त उत्तानासन

हस्त उत्तानासन करताना हात वर उचलून शरीर थोडे मागे वाकवले जाते. यामुळे छातीचा भाग उघडतो आणि श्वास अधिक खोल घेता येतो. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते.

वज्रासन

वज्रासन पचन सुधारण्यासाठी उपयुक्त मानले जाते. पचन व्यवस्थित झाल्यास शरीरावर अनावश्यक ताण कमी होतो. या आसनामुळे शरीर रिलॅक्स राहते आणि रक्ताभिसरण सुरळीत राहण्यास मदत होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts