• Home
  • मनोरंजन
  • आर्यन खानने चोरले मित्राचे बूट, व्हिडीओ होतोय व्हायरल, नेमकं घडलं काय?
ताज्या बातम्या

आर्यन खानने चोरले मित्राचे बूट, व्हिडीओ होतोय व्हायरल, नेमकं घडलं काय?

aryan khan

Aryan Khan | शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण आर्यन खानने चक्क त्याच्या मित्राचे बूट चोरले आहेत. एवढंच नाही तर आर्यनने मित्राचे बूट चोरल्यानंतर मिनी वॉर देखील झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या आर्यन खानचा हा बूट चोरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इराणमध्ये ड्रोन रॅली; लष्कराच्या समर्थनार्थ उसळली जनतेची लाट

आर्यन खानचा अनोखा अंदाज, चोरले मित्राचे बूट

अलीकडेच आर्यन खान त्याच्या एका मित्राच्या लग्नाला गेला होता. तर या लग्नात बूट चोरण्याच्या कार्यक्रम करण्यात आला. मात्र, हा बूट चोरल्यानंतर मोठा वाद देखील निर्माण झाला. तर या मजेशीर घटनेचा व्हायरल व्हिडिओ ‘झेस्ट इव्हेंट्स अँड वेडिंग्स’ या लक्झरी वेडिंग प्लॅनरने शेअर केला आहे. तर माहिर मेहता आणि रिया नाडकर्णी यांचं लग्न होतं. तर वराच्या जिवलग मित्रांच्या यादीत आर्यन खानचाही समावेश होता.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आर्यन खान बूट चोरून पळताना दिसत आहे. तर यावेळी आर्यन खानने त्याच्या मित्राच्या बूट चोरण्याच्या कार्यक्रमात जीन्स आणि तपकिरी जॅकेट घातलेलं दिसत आहे. आर्यन खान वधूच्या बाजूने असलेल्या लोकांच्या हातातून बूट हिसकावून चांगलीच मजा घेताना दिसत आहे. यादरम्यान आर्यन खानचा अनोखा अंदाज तर दिसलाच पण त्याने बूट चोरण्याच्या या कार्यक्रमात चांगलीच मज्जा केल्याचं दिसत आहे.

आर्यन खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर आर्यनच्या या अनोख्या अंदाजावर त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. एका युझरने म्हटले आहे की, आर्यन खानला अशा मजेशीर अंदाजात पाहून खूप मजा आली. दुसऱ्याने लिहिले की, आर्यनने खरंच माझं मन जिंकलं… एक खरा मित्र. तर तिसऱ्याने लिहिले, आर्यन खानला इतकी मजा करताना मी पहिल्यांदाच पाहिलं आणि तो किती गोड आहे हे मला खूप आवडलं. आर्यन खानचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला असून सर्वजण आर्यनच कौतुक करताना दिसत आहेत.

दरम्यान, आर्यन खान हा बॉलिवूड सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून नव्हे तर कॅमेऱ्यामागील निर्माता म्हणून दाखल झाला आहे. त्याने ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या नेटफ्लिक्स मालिकेद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. ही एक व्यंगात्मक नाट्यमालिका असून, यात हिंदी चित्रपटसृष्टीतील चढ-उतारांचे चित्रण केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts