Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • FDA ची शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस; पान मसाला जाहिरातींवर कारवाई
Top News

FDA ची शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस; पान मसाला जाहिरातींवर कारवाई

FDA Notice Bollywood Actors
0

FDA Notice Bollywood Actors : हॉटेलं झाली, कँटीन झाली, डेअरी झाली, टपरी झाली… आली रे आली… आता तुमची बारी आली! ‘दाने दाने में केसर का दम’ असं म्हणत ‘बोलो जुबां केसरी’चा डायलॉग हाणणाऱ्या बॉलिवूडच्या स्टार मंडळींवर आता FDA च्या वाघानं पंजा मारलाय. इलायची, माऊथ फ्रेशनरच्या नावाखाली पान मसाल्याच्या जाहिरात करणाऱ्या बॉलिवूडच्या स्टार मंडळींच्या थेट घरात FDA ची नोटीस जाऊन धडकलीये. कोण आहेत हे तीन बॉलिवूड स्टार जे टायगर मुंढेंच्या नोटिशीपुढं झालेत गपगार?

FDA ची शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस; पान मसाला जाहिरातींवर कारवाई

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता आपल्या कारवाईचा मोर्चा बॉलीवूड सेलिब्रिटींकडं वळवलाय. कोणकोणते बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत मुंढेंच्या रडारवर? कुणाकुणाच्या घरी धाडण्यात आलीये नोटीस? आणि FDA चं म्हणणं नेमकं आहे तरी काय?

नंबर एकवर आहे बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान, नंबर दोन अजय देवगण आणि नंबर तीन जॅकीपुत्र टायगर श्रॉफ! ‘बोलो जुबां केसरी’ वाले हे स्टार लोक आता ‘टायगर’ मुंढेंच्या रडारवर आलेत. तुकाराम मुंढेंच्या FDA नं या तिन्ही स्टार मंडळींना थेट नोटीस धाडलीये. FDA चं म्हणणं अगदी साधं सरळ आहे. तुम्ही जाहिरात करता इलायची, माऊथ फ्रेशनरची पण ब्रँडचं नाव तेच असतं जे पानमसाल्याचं असतं. म्हणजे ही तर सरोगेट ॲडव्हर्टायझिंग! एका पान मसाल्याच्या जाहिरातीच्या माध्यमातून एका बड्या कंपनीच्या तत्सम उत्पादनाची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याचा आरोप करत FDA नं अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ या तीन स्टार मंडळींना कारणे दाखवा नोटीस बजावलीये. नुसतीच नोटीस धाडली नाही तर कायद्यानं गुटख्याची जाहिरात करण्यावर बंदी असताना सरोगेट ॲडव्हर्टायझिंग का केली यावर FDA नं स्पष्टीकरण देखील मागितलंय.

हेही वाचा : स्कूल ठीक करो CJP ची देशभर मोहीम आंदोलन पेटलंय सरकारची

शाहरुख, अजय आणि टायगरला नोटीस का? ( FDA Notice Bollywood Actors )

FDA कडून अजय देवगण ( Ajay Devgn ) , शाहरुख खान ( ShahRukh Khan ) आणि टायगर श्रॉफ ( Tiger Shroff ) या तिन्ही अभिनेत्यांना नोटीस पाठवण्यात आल्यानं या सेलिब्रिटीजचे धाबे दणाणले आहेत. अजय देवगणच्या जुहूच्या घरी, शाहरुखचं ‘मन्नत’, तर टायगर श्रॉफच्या Tiger Shroff Productions LLP या प्रॉडक्शन हाऊसवर या नोटिशी धाडण्यात आल्या आहेत. 13 जुलै 2026 च्या आदेशानुसार महाराष्ट्रात पान मसाल्याचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आलीये आणि याच पार्श्वभूमीवर FDA नं या तिन्ही अभिनेत्यांना जाहिरातीतील त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलंय.

तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा बॉलीवूड सेलिब्रिटींकडं वळवला असतानाच तिकडं तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा-पान मसाल्याविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात आलीये. प्रतिबंधित उत्पादनांच्या संघटित नेटवर्कवर कारवाईसाठी पोलिसांच्या मदतीनं MCOCA अंतर्गत कारवाईची तयारीही सुरू केलीये.

तुकाराम मुंढेंची FDA कारवाई आणखी तीव्र

तुकाराम मुंढे… द लिजंड! 25 मे ला पदभार घेतला आणि पहिल्या 6 च दिवसात 203 धाडी, 102 जणांना अटक करत 68 दुकानं सील केली. मुंबई, पुण्यातली मोठमोठी हॉटेलं, डेअरी, ब्रँड सगळ्यांचे परवाने निलंबित करण्याची धमक दाखवली. तुकाराम मुंढेंनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतला आणि भेसळयुक्त व नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक असलेले खाद्यपदार्थ, उत्पादनं आणि हॉटेल्सवर कारवाई करण्याचा सपाटाच लावला. गेली पावणेतीन महिन्यात दररोज राज्यात कुठं ना कुठं तरी FDA च्या पथकाकडून धाड पडतेच आहे. कुठं भेसळयुक्त माल पकडला जातोय, तर कुठं हॉटेल, डेअरी, दुकानात अस्वच्छता असल्याच्या कारणावरून संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित केले जातायत. आणि आता हा वाघ बॉलिवूडकडं वळलाय. ‘बोलो जुबां केसरी! दाने दाने में है केसर का दम,’ हा डायलॉग हाणत स्वतः मात्र जाहिरातीतून लाखो-करोडो कमवायचे आणि आपल्या लाखो फॅन्सना प्रत्यक्ष पानमसाला, गुटखा खाऊन पचापच थुंकायला लावायचं. सुपारी, पानमसाल्यात कॅन्सर होणारे घटक असतात पण जाहिरातीतून पैसे कमावण्याची चटक लागलेल्या या स्टार मंडळींना कुणाच्या जिवाचं पडलंय हो?

स्वतः तर खात नाहीत पण जाहिरातीतून आम्हीही पान मसाला, सुपारी खात असल्याचा खोटा आव आणायचा आणि पैसा कमवायचा हेच यांचं काम! पण आता या स्टार मंडळींनी मारलेल्या याच डायलॉगमुळं त्यांना FDA नं नोटीस धाडलीये. बघूयात, आता या नोटिशीला अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ काय उत्तर देतायत… कारण हॉटेलं झाली, कँटीन झाली, डेअरी झाली, टपरी झाली… आली रे आली… आता तुमची बारी आली!

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : The Best Digital Marketer Award

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts