• Home
  • महाराष्ट्र
  • “ज्याचं मी भलं केलं त्यानेच मला धोका दिला…”, अशोक खरातने पोलिसांसमोर मांडली आपली व्यथा, केला धक्कादायक खुलासा
Top News

“ज्याचं मी भलं केलं त्यानेच मला धोका दिला…”, अशोक खरातने पोलिसांसमोर मांडली आपली व्यथा, केला धक्कादायक खुलासा

kharat

Ashok Kharat Case | नाशिकमध्ये (Nashik) अध्यात्मिक गुरू आणि ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक खरातचे (Ashok Kharat) काळे कारनामे आता समोर आले आहेत. अशोच खरातने अनेक महिलांचे, तरूणींचे लैंगिक शोषण करत त्यांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातला नोशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी खरातला अटक केल्यानंतर अनेक नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी आता एसआयटीकडून केली जात आहे. अशातच अशोक खरातची पोलिसांनी कसून चौकशी केली असून त्याने पोलिसांना काही मोजकीच धक्कादायक माहिती दिल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – ढोंगीबाबा अशोक खरातची केली HIV टेस्ट; रिपोर्टमध्ये काय आलं समोर?

अशोक खरातने पोलीस तपासात काय केला दावा?

पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातने महिलांच्या लैंगिक शोषणाबाबत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. चौकशीदरम्यान खरातने केविलपणाचा आव आणत पोलिसांना उत्तरे दिली आहेत. “मी महिलांसोबत केलेली कृती हा एक माझ्या विधीचाचा एक भाग होता. मी कोणावरही जबरदस्ती केलेली नाही”, असा खळबळजनक दावा अशोक खरातने केला आहे, ज्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे.

अशोक खरातला कोणी दिला धोका?

अशोक खरातला नेमका कोणी धोका दिला? याबाबतही अशोक खरातने पोलिसांना सांगितले. “ज्यांचे मी भले केले तेच लोक माझ्यावर उलटले आहेत. तसेच मला माझ्या अंतर्मनाने धोका दिला आहे. यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचेचे ऐकणार आहे”, असंही खरातने पोलिसांना सांगितले.अशोक खरातने केलेल्या या दाव्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, अशोक खरातला अटक केल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकला होता. या तपासात पोलिसांना एक पेनड्राईव्ह सापडला असून या पेनड्राईव्हमध्ये 300 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. तर पोलिसांनी खरातच्या नाशिकमधील ओकस कार्यालयातही झाडाझडती केली. या तपासात पोलिसांनी तांब्याची एक बाटली, खडे, गंडे दोरे, स्प्रे, सॅनिटायझर आणि काही महिलांचे केस जप्त केले आहेत. तसेच पोलिसांना त्याच्या कार्यालयात काही आर्थिक व्यवहारांची कागदपत्रेही मिळाली आहेत.

अशोक खरातने अनेक महिलांचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. त्याने विवाहित महिला आणि तरूणींचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. नराधम खरातला अटक केल्यानंतर त्याचे अनेक काळे कारनामे उघडकीस येताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts