• Home
  • राजकारण
  • “अशोक खरातचा एन्काऊंटर होणार, कारण…”, प्रणिती शिंदेंनी केला खळबळजनक दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
Top News

“अशोक खरातचा एन्काऊंटर होणार, कारण…”, प्रणिती शिंदेंनी केला खळबळजनक दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

shinde kharat

Praniti Shinde On Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) ढोंगीबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरवून सोडले आहे. अशोक खरातने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच अनेक महिलांचे त्याने लैंगिक शोषण केले आहे. तर याच ढोंगी खरातचे अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबत, बड्या उद्योगपतींसोबत जवळचे संबंध होते. त्यामुळे या प्रकरणाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातचा काळा कारनामा बाहेर आल्यानंतर त्याला नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अटक केली असून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे. अशातच आता या प्रकरणावर काँग्रेस (Congress) खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – अमरावतीत 180 तरूणींवर लैंगिक अत्याचार, MIM चा नेताच निघाला आरोपी, धक्कादायक प्रकार उघड

आज सोलापूर येथे संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर प्रणिती शिंदेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं.

अशोक खरात प्रकरणावर काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आपण एकिकडे महिलांच्या आरक्षणावर बोलत असतो. मात्र, दुसरीकडे महिलांचं शोषण होत असेल तर तुम्ही आरक्षण कसं लागू कराल? जर तुमचे विचार महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करणार? असा थेट सवाल प्रणिती शिंदेंनी उपस्थित केला.

पुढे त्या म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरणात मला अजूनही वाटत आहे की, लवकरच काही पुरावे बाहेर येणार आहेत. पण, मी तुम्हाला सांगते की हे पुरावे बाहेर येण्याअगोदर खरातचं हे लोक काहीतरी करतील, असं मला वाटत आहे, असा संशय प्रणिती शिंदेंनी व्यक्त केला आहे.

अशोक खरातचा एन्काऊंटर होणार?

अशोक खरातचा कुठेतरी एन्काऊंटर करतील, असं मला वाटत आहे. कारण या प्रकरणातून खूप नावे समोर येणार आहेत. जे लोक खरातशी जोडले आहेत त्या सर्वांची नावे समोर येणार आहेत. आत्ता जे सत्ताधारी आहेत किंवा मंत्री आहेत त्यांना धरूनही ही नावे समोर येणार आहेत, असा खळबळजनक दावा प्रणिती शिंदेंनी केला आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळाच विविध चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts