• Home
  • राजकारण
  • सोलापुरात भाजपचा दणदणीत विजय; मनसे पदाधिकाऱ्यांचा खून केलेल्या शालन शिंदे देखील विजयी
ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचा दणदणीत विजय; मनसे पदाधिकाऱ्यांचा खून केलेल्या शालन शिंदे देखील विजयी

BJP Victory in Solapur

BJP Victory in Solapur : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली. आज सकाळपासून मतमोजणी प्रक्रिया पार पडत असून सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरु आहे. अनेक महापालिकांचा निकाल आता बऱ्यापैकी लागला आहे. बऱ्यापैकी भाजपने आपले वर्चस्व टिकवून ठेवल्याचे चित्र बघायला मिळाले. काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्याचा खून करण्यात आला होता. आता त्याच प्रभागातून भाजप विजयी ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूर महापालिकेचा निकाल हाती आले आहे. सोलापूर महापालिकेमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या मनसेचे युवा नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर या प्रभागात कोण निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. प्रभागात भाजपकडून शालन शिंदे या उमेदवार म्हणून उभ्या होत्या, तर याच प्रभागात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख हे देखील मैदानात उतरले होते. त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे गणेश कुलकर्णीउभे होते. त्यांचा दारुण पराभव झाला असून आता या प्रभागातून भाजपचे सर्व उमेदवार विजयी ठरले आहे. किरण देशमुख यांनी तब्बल 11 हजार मतांनी विजय मिळवला आहे.

मनसेचे बाळासाहेब सरवदे यांचा शालन शिंदे यांनी खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी शालन शिंदे यांना अटक करण्यात आली होती. परंतु या हत्येचा कोणताही परिणाम झाल्याचे शालन शिंदे यांच्यावर दिसून येत नाही. त्यांनी तुरुंगातून निवडणूक जिंकली असून खून करून देखील शालन शिंदे पहिल्या फेरीपासूनच लीड वर दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts