Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का, ३ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात पक्षप्रवेश
Top News

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का, ३ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात पक्षप्रवेश

BJP setback ahead of elections

BJP setback ahead of elections : भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्या कथित हुकूमशाही कारभाराला कंटाळून मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेविकानगरसेवकांनी शिंदे गटमध्ये प्रवेश केल्याचा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका दीपाली मोकाशी, वीणा भोईर तसेच नगरसेवक सूर्यकांत भोईर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे तर या शिंदे गटाची मोठी ताकद वाढली आहे.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या सर्व नेत्यांना शिवसेनेत सन्मान आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येतील. मीरा-भाईंदर शहरात यावेळी भगव्याची लाट असून, जो कोणी भगवा हाती घेईल, त्याच्या पाठीशी शिवसेना आणि प्रताप सरनाईक ठामपणे उभे राहतील.

‘अजितदादा नेतृत्त्वात सर्व प्लॅन तयार’; सुप्रिया सुळेंनी सर्वच सांगितलं

काम करूनही उमेदवारी नाकारण्यात आली

मी भाजपमध्ये अनेक वर्षे काम केल. सलग आठ वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही मला विश्वासात न घेता उमेदवारी नाकारण्यात आली. ज्यांनी कधीच पक्षासाठी काम केल नाही, त्यांना तिकीट देण्यात आल. आम्ही लढणारे आहोत, रडणारे नाहीअसं भाजपकडून उमेदवारी नाकारल्याबाबत बोलताना माजी नगरसेविका दीपाली मोकाशी म्हणाल्या.

भाजपमध्ये फक्त नरेंद्र मेहता यांचे जवळचे आणि ठेकेदार यांचाच विचार केला जातो. आम्ही चुकीच्या गोष्टींवर प्रश्न उपस्थित केले म्हणून आमच्यावर अन्याय झाला. माझे तिकीट एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कापल्यासारखे वाटते,’ असा दीपाली मोकाशी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

चुकीच्या कामांना साथ दिली नाही, म्हणूनच कारवाई

दीपाली ताईंसारखीच माझीही अवस्था झाली. कोणतेही कारण न देता माझे तिकीट कापण्यात आले. भाजपच्या नावाखाली काही लोक स्वतःची हुकूमशाही चालवत आहेत. मी चुकीच्या कामांना साथ दिली नाही, म्हणूनच माझ्यावर ही कारवाई झाली,’ असललं माजी नगरसेविका वीणा भोईर यांनीही नाराजी व्यक्त करत सांगितले,

नरेंद्र मेहता माझ्या मागे लागू शकत नाहीत. मी सत्याच्या बाजूने उभा आहे,’ असं नगरसेवक सूर्यकांत भोईर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. या प्रवेशामुळे मीरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts