Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराला हृदयविकाराचा धक्का; अजित पवार गटाला धक्का
Mumbai

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराला हृदयविकाराचा धक्का; अजित पवार गटाला धक्का

Political candidate being rushed for medical help after heart attack
95

Candidate heart attack after filing nomination : सध्या महापालिका निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. 30 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यादरम्यान मीरा भाईंदर येथून एका उमेदवाराने अर्ज दाखल केला. परंतु काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अजित पवार गटाला धक्का बसला आहे.

मीरा भाईंदर येथे जावेद पठाण (वय ६६) हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते त्यांनी सकाळी १० ते ११ या वेळेत प्रभाग क्रमांक २२ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिरा रोड येथील हैदरी चौक परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हे ही वाचा : अकोला, पुण्यात बघायला मिळाला ‘गल्लीत गोंधळ-दिल्लीत मुजरा; अधिकाऱ्यांना दिले चिल्लर

या घटनेमुळे मिरा–भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्याने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला जात आहे. महापालिका निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी या निवडणुकांचे निकाल हाती येणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर एकूण महापालिकेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी 11 हजार 391 अर्ज वितरित करण्यात आले होते. सर्वाधिक उमेदवारी अर्ज एम पूर्व विभागातून 182 इतके सर्वाधिक उमेदवार रिंगणात. तर सर्वात कमी आर मध्य विभागातून 51 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. काळ उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आज नामनिर्देशन पत्र भरलेल्या उमेदवारांची छाननी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts