• Home
  • राजकारण
  • मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य; गायिका अंजली भारतीची जीभ घसरली, कारवाई करण्याची मागणी
Top News

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य; गायिका अंजली भारतीची जीभ घसरली, कारवाई करण्याची मागणी

Anjali Bharti Controversial Statement

Anjali Bharti Controversial Statement : प्रख्यात गायिका अंजली भारतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बायको अमृता फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून भाजप गट आणि शिवसेना शिंदे गट आक्रमक झाले आहेत. एवढेच नाही तर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील या वक्तव्याचा निषेध करण्यात येत असून अमृता फडणवीस यांचे समर्थन करण्यात येत आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून निषेध व्यक्त

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल प्रख्यात गायिका अंजली भारती यांनी चुकीचे विधान केले आहे. भारतात होणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर बोलतांना अंजली भारतीने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा उल्लेख करत खालच्या दर्जाचे विधान केले. यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत ठाकरे गटाच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी ट्विट केले आहे. याशिवाय संजय राऊत, अंबादास दानवे यांनी देखील हे विधान अयोग्य असल्याचे म्हंटले आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

गायिका अंजली भारतीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एका कार्यक्रमावेळी अंजली भारतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीवर म्हणजेच अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यामुळे आता अंजली भारतीवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरावरून करण्यात येत आहे. 13 जानेवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वादग्रत वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

खालच्या दर्जाचे वक्तव्य करत संपत्ती नावावर करण्याचे आवाहन

13 जानेवारी रोजी भंडारा येतेच भीम मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये अंजली भारतीने महिलांवरील अत्याचार आणि बलात्कारांवर टीकास्त्र डागले. या टीकास्त्रवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल देखील वक्तव्य केले. जे की आक्षेपार्ह आणि चुकीचे होते. कोणतेही कारण नसताना सांस्कृतिक कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्यावर चुकीचे. अत्यंत खालच्या दर्जाचे वक्तव्य करणे हे अयोग्य होते. यावेळी अंजली भरती म्हणाल्या कि, ‘जो बलात्कार करतो त्यांचं डोकं कापा…. जो कोणी बलात्का करणाऱ्याचे डोकं किंवा मान कापून आणेल त्याला मी माझी संपत्ती देईल. आणि 50 लाख रुपये देईल.’ या विषयावर बोलतानाच अंजली भारतीने या विषयात मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांना खेचले.

हे ही वाचायुजीसीच्या नवीन कायद्यांमुळे विद्यार्थी रस्त्यावर, युपी, बिहार, राजस्थानमध्ये निषेधाचे पोस्टर्स

कोण आहे अंजली भारती

अंजली भरती ही बौद्ध अनुयायी विद्रोही गायिका म्हणून ओळखली जाते. तिचे दीदी अंजली भारती नावाने युट्युब चॅनेल आहे. या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून अनेक गाण्यांचे व्हिडीओ ती अपलोड करत असते. आता तिने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आली आहे. तिच्यावर काय कारवाई होणार हे पाहणे आता योग्य ठरेल.

अमृता फडणवीस यांच्यावरील टीकेनंतर नवनीत राणांचा निषेध

या प्रकरणी अमरावतीच्या भाजप स्टार प्रचारक तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. महिलांवर अशा प्रकारे सार्वजनिक मंचावरून टीका करणे चुकीचे असून, ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले. अमृता फडणवीस या एक स्वतंत्र ओळख असलेल्या व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या कार्याचा सन्मान केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, येत्या काळात याचे पडसाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts