नवी दिल्ली IGI Airport Accident : दिल्ली विमानतळावर एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दिल्ली विमानतळावर दोन विमानांची टक्कर झाली. ही विमानं स्पाईसजेट (spicejet) आणि अकासा एअरची (akasa air) असल्याचं मानलं जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचं वृत्त नाही. दोन्ही विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात निवेदनं जारी केली आहेत.
हेही वाचा : मुलाचं ऑफर लेटर वाचताना वडील भावुक; व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांचे
अकासा एअरनं काय म्हटलं :
“दिल्ली ते हैदराबादला जाणारं अकासा एअरचे विमान QP 1406 16 एप्रिल 2026 रोजी बंगालच्या उपसागरात परतलं. प्राथमिक माहितीनुसार, अकासा एअरचं विमान स्थिर असताना दुसऱ्या विमान कंपनीच्या विमानाला धडकलं. सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून, प्रवाशांना लवकरात लवकर हैदराबादला पोहोचवण्यासाठी आमची ग्राउंड टीम पर्यायी व्यवस्था करत आहे. ठरलेल्या कार्यपद्धतीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. अकासा एअरमध्ये आमच्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे.”
स्पाईसजेटनं काय म्हटलं? :
दुसरीकडे स्पाईसजेटच्या प्रवक्त्यानुसार, “16 एप्रिल रोजी दिल्ली विमानतळावर टॅक्सींग करत असताना स्पाईसजेटच्या बी737-700 विमानाचा अपघात झाला. परिणामी, विमानाचा उजवा पंख आणि दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाचा डाव्या बाजूचा हॉरिझॉन्टल स्टेबिलायझर खराब झाला. स्पाईसजेटचं विमान दिल्लीत थांबवण्यात आलं आहे.”
यापूर्वी शनिवारी सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं होतं. विशाखापट्टणमहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला आपत्कालीन लँडिंग करण्यास भाग पडले. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या वृत्तानंतर विमानतळावर हाय अलर्ट जाहीर करण्यात आला होता. ज्या विमानाने आपत्कालीन लँडिंग केलं, ते तुर्कस्तानच्या कोरेन्डॉन एअरलाइन्सकडून इंडिगोला भाडेतत्त्वावर देण्यात आलं होतं.






