Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी गौतमी पाटीलचा ‘रोड शो’;  मतदारांना केलं महत्त्वाचं आवाहन 
Top News

काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी गौतमी पाटीलचा ‘रोड शो’;  मतदारांना केलं महत्त्वाचं आवाहन 

Gautami Patil Road show

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही राजकीय नेते सिनेकलाकारांच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ आणि काँग्रेस उमेदवारांचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध लावणी कलावंत आणि अभिनेत्री गौतमी पाटीलने मूल शहरात मोठा रोड शो केला. या रोड शोमध्ये अनेक राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात हा रोड शो पार पडला. तिच्या या रोड शो मुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची धाकधूक वाढली आहे.

गौतमी पाटील माध्यमांशी बोलताना काय म्हणाली?

यावेळी गौतमी पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाली, “मला इथं येऊन खूप छान वाटतंय. मी अनेक ठिकाणी जाते. सर्व ठिकाणी मला भरभरून प्रेम मिळतंय. मूल शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्षातील उमेदवारांना आणि नगराध्य पदाकरिता उभ्या असलेल्या एकता समर्थ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा”, असं आवाहनही गौतमीनं यावेळी केलं आहे.

हेही वाचा – ऐन वेळेवर निवडणूक कॅन्सल; निवडणूक आयोगावर मुख्यमंत्री यांचे स्पष्ट वक्तव्य

‘रोड शो’च्या माध्यमातून काँग्रेसला विजयी करण्याचं आवाहन

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटीलने मूल येथे काँग्रेससाठी प्रचार केला. या ‘रोड शो’च्या माध्यमातून काँग्रेसला विजयी करण्याचं आवाहन गौतमी पाटीलने केलं. एकता समर्थ मूल शहरासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. हे क्षेत्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात येत असल्याने इथे शेवटच्या क्षणी काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आहे.

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस

गौतमी पाटीलची लोकप्रियता पाहता उमेदवारांनी तिचा रोड शो केल्याचं सांगितलं जात आहे. या रोड शोला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, राज्यातल्या नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. विविध पक्षांचे नेते मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज रात्री 10 वाजता हा प्रचार संपणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts