• Home
  • राजकारण
  • “जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं..”; गोपीचंद पडळकरांचे आरोप
Top News

“जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं..”; गोपीचंद पडळकरांचे आरोप

Gopichand Padalkar Criticism

Gopichand Padalkar Criticism : जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी (Maharashtra Politics) प्रयत्न केलता, हे तुम्हाला माहित आहे ना. जर ते विशाल पाटलाला (Vishal Patil) खासदार करू शकत असतील तर त्यांनी त्यांच्या मुलाला केलं असतं का नाही?. सगळ्या पोरांचं लॉन्चिंग झालं आहे. आता सगळ्यात जास्त दुःख त्याला आर आर पाटील (R.R. Patil) यांचे पोरग आमदार झाला, पण त्याचे होईना. सगळ्यात दुःख जयंत पटालांना त्याचं आहे, असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार पक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांज्यावर केल आहे.

हेही वाचा – भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची एसआयचीसमोर चौकशी

सांगली आणि हातकणंगलेमध्ये त्याच्या मुलांसाठी प्रयत्न करून बसलेत. विशाल पाटील खासदार व्हावा जयंत रावांची इच्छा आहे का? जयंतरावने आईची शपथ घेऊन सांगावं की विशाल पाटील खासदार व्हावं, असे वाटत होतं का?, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलीय. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री हे शेतकरी नेते आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. मी शेतकरी नेता नाही. पण या सगळ्या विषयात कांद्याच्या भावाच्या संदर्भात मुख्यमंत्री केंद्र सरकारची चर्चा करून एक चांगला मार्ग काढतील, असं देखील यावेळी पडळकर म्हणाले.

संग्राम जगताप हे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पुढे येऊन काम करतात. त्यांच्या पक्षाची विचारधारा जरी वेगळी असली तरी त्याचा तो विचार न करता त्याची तमा न बाळगता अत्यंत झोकुन देऊन ते काम करतात आणि अहिल्यानगर सारख्या शहरामध्ये करतायेत जिथे मुस्लिम एरिया आहे. ते मताचा विचार करत नाही ते निवडणुकीचा विचार करत नाही.

परंतु हिंदू धर्म टिकला पाहिजे परंपरा टिकल्या पाहिजे. हिंदू मुलींच्या संदर्भात हायेस्ट तिथे तक्रारी आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर त्यांनी जो विषय पुढे आणलाय तो विषय अत्यंत अभ्यासपूर्ण पुढे आणलेला आहे. आणि त्यामुळे त्या गोष्टीला माझा समर्थन असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts