• Home
  • महाराष्ट्र
  • मुंबई-पुण्यासह देशभर मेडिकल बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
ताज्या बातम्या

मुंबई-पुण्यासह देशभर मेडिकल बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या

Medical Shop Closer

Nationwide Medical Shop Strike Disrupts Pharmacies in India: आज २० मे रोजी, मुंबई- पुण्यासह देशभरात औषधांचे दुकान बंद आहेत. काय आहे यामागचं नेमकं कारण जाणून घ्या.

ई-फार्मसी, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सवलती आणि किरकोळ औषध व्यवसायावर होणाऱ्या परिणामाविरोधात आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय बंद पुकारला आहे. या आंदोलनामुळे मुंबई, पुणे आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये मेडिकल दुकाने बंद राहिली असून रुग्णांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

देशभरात औषध दुकाने बंद

‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’(AIOCD) आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील लाखो औषध विक्रेत्यांनी आज आपली दुकाने बंद ठेवली आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे यांसारख्या शहरांमध्ये या बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.

ई-फार्मसीविरोधात तीव्र नाराजी

ऑनलाईन औषध विक्री वाढत असल्याने पारंपरिक किरकोळ औषध व्यवसाय धोक्यात आल्याचा आरोप व्यापारी संघटनांनी केला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची घरपोच विक्री, मोठ्या सवलती आणि नियमांचे उल्लंघन यामुळे बाजारपेठे परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

औषध बाजारपेठेत शांतता

सकाळपासूनच बहुतांश शहरांतील मेडिकल दुकाने बंद असल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. नियमित औषध घेणाऱ्या रुग्णांनी मात्र संभाव्य अडचण लक्षात घेऊन आधीच औषधसाठा करून ठेवल्याने मोठी धावपळ टळल्याचे चित्र आहे.

विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्या

औषध विक्रेत्यांनी ई-फार्मसीवर कठोर नियंत्रण किंवा बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच ऑनलाइन सवलतींमुळे निर्माण होणारी अन्यायकारक स्पर्धा थांबवावी, औषध विक्रीसाठी कठोर आणि पारदर्शक कायदा करावा, तसेच परवाना प्रक्रियेत सुलभता आणावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून उपाययोजना

या बंददरम्यान रुग्णांना अडचण होऊ नये म्हणून राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आपत्कालीन व्यवस्था केली आहे. रुग्णालयांमधील इन- हाऊस मेडिकल्स आणि २४ तास सुरू असलेली आपत्कालीन औषध दुकाने या बंदमधून वगळण्यात आली आहेत.

सरकारकडे चर्चेची मागणी

औषध विक्रेता संघटनांनी सरकारने केवळ कारवाईची भूमिका न घेता संवाद साधावा आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. ई-फार्मसी आणि पारंपरिक औषध विक्री यामधील संघर्षावर लवकर निर्णय अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts