• Home
  • बिजनेस
  • अमेरिकेच्या कडक शुल्कधोरणाची धास्ती; सेन्सेक्स–निफ्टी कोसळल्यानं गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
ताज्या बातम्या

अमेरिकेच्या कडक शुल्कधोरणाची धास्ती; सेन्सेक्स–निफ्टी कोसळल्यानं गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले

Share Market Highlights

Indian Stock Markets : जागतिक शेअर बाजारांतील तीव्र अस्थिरता आणि अमेरिकेकडून होऊ शकणाऱ्या मोठ्या शुल्कवाढीच्या चर्चेमुळं भारतीय भांडवली बाजारावर गुरुवारी दबाव दिसून आला. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास एक टक्क्यानं खाली आले. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळं बाजारातील नकारात्मकता आणखी वाढली.

जागतिक संकेतांनी वाढवली चिंता :

अमेरिकेतील धोरणात्मक अनिश्चितता, जागतिक व्यापार तणाव आणि कमॉडिटी बाजारातील घसरण याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला. धातू, तेल-वायू आणि कच्च्या मालाशी संबंधित क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री दिसून आली, ज्यामुळं एकूण बाजारभावना कमकुवत झाली. सरकारनं जाहीर केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7.4 टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. मात्र हा आशावादी अंदाजही बाजाराला सावरण्यास पुरेसा ठरला नाही. सलग चौथ्या सत्रात मंदीचा कल कायम राहिला.

निर्देशांकांमध्ये मोठी घसरण :

सत्रअखेरीस सेन्सेक्स सुमारे 780 अंशांनी घसरुन 84 हजारांच्या खाली बंद झाला, तर निफ्टीत 260 हून अधिक अंशांची घसरण नोंदवली गेली. दिवसादरम्यान दोन्ही निर्देशांकांनी नीचांकी पातळी गाठली होती. या घसरणीमुळं सेन्सेक्समधील कंपन्यांचं एकत्रित बाजारमूल्य जवळपास 8 लाख कोटी रुपयांनी कमी झालं. पायाभूत सुविधा, आयटी आणि ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचे समभाग विक्रीच्या रेट्यात अडकले. मात्र बँकिंग आणि संरक्षण क्षेत्रातील काही शेअर्सनी घसरणीचा वेग काही प्रमाणात रोखण्याचा प्रयत्न केला.

500 टक्के शुल्काचा मुद्दा काय? :

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिंब्यानं पुढं आलेल्या एका निर्बंध विधेयकामुळं बाजारात अस्वस्थता वाढली आहे. या प्रस्तावानुसार रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर प्रचंड, म्हणजे 500 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारलं जाऊ शकते. याबाबत अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts