• Home
  • ताज्या बातम्या
  • शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊनं मारली बाजी; 21 वर्षीय खेळाडू ठरला विजयाचा नायक
Top News

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊनं मारली बाजी; 21 वर्षीय खेळाडू ठरला विजयाचा नायक

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊनं मारली बाजी; 21 वर्षीय खेळाडू ठरला विजयाचा नायक

कोलकाता LSG Beat KKR : इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 15वा साखळी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेर लखनऊ सुपर जायंट्सनं हा सामना तीन गडी राखून जिंकला, ज्यात 21 वर्षीय मुकुल चौधरीनं विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

 

हेही वाचा : स्मृती मानधना-पलाश मुच्छलचा पॅचअप? ‘त्या’ व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ

 

कोलकाताची प्रथम फलंदाजी :

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यास अजिबात वेळ घालवला नाही. यानंतर प्रथम फलंदाजी करताना, कोलकाता नाईट रायडर्सनं निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 181 धावा केल्या. केकेआरकडून अंगक्रिश रघुवंशीनं 45, तर अजिंक्य रहाणेनं 41 धावा केल्या. कॅमेरॉन ग्रीननंही 32 आणि रोव्हमन पॉवेलनं नाबाद 39 धावा केल्या. गोलंदाजीत लखनऊ सुपर जायंट्सकडून प्रिन्स यादव, एम. सिद्धार्थ, दिग्वेश राठी आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

मुकुल चौधरीची अप्रतिम खेळी :

प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना, लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली आणि 104 धावांत त्यांचे निम्मे फलंदाज बाद झाले, तर 128 धावांत त्यांच्या सात विकेट्स पडल्या. त्यानंतर 21 वर्षीय मुकुल चौधरीनं 27 चेंडूंमध्ये नाबाद 54 धावा करुन आपल्या संघाच्या रोमांचक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मुकुल चौधरीनं आपल्या खेळीत दोन चौकार आणि सात षटकार मारले. आयुष बडोनीनंही लखनऊ सुपर जायंट्ससाठी 54 धावांचं योगदान दिलं. या हंगामातील चार सामन्यांमधील केकेआरचा हा तिसरा पराभव असून, ते विजयाविनाच राहिले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सकडून वैभव अरोरा आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर सुनील नरेन, कार्तिक त्यागी आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts