• Home
  • देश
  • इराण पुन्हा आक्रमक! अमेरिका-इस्त्रायलवर पुन्हा केला मोठा हल्ला, तणाव शिगेला
Top News

इराण पुन्हा आक्रमक! अमेरिका-इस्त्रायलवर पुन्हा केला मोठा हल्ला, तणाव शिगेला

iran 4

Iran Attack On US-Israel | काल(10 मार्च) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमधील युद्ध (War) जवळपास संपले असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे सर्वांना मोठा दिलासा मिळाला होता. पण त्यानंतर इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर देत युद्धाचा शेवट आम्ही करू असं म्हणत पु्न्हा युद्ध पेटवलं. तर आता इराणने इस्त्रायल आणि अमेरिकेवर सगळ्यात मोठा हल्ला केला आहे. ज्यामुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – 13 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; हरिश राणाला इच्छामरणाची परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

क्लस्टर बॉम्ब टाकत इराणचा सर्वात मोठा हल्ला

अमेरिका आणि इस्त्रायल देशावर इराणने आमि हिजबुल्लाहने संयुक्तपणे हल्ला केला आहे. इराणने क्लस्टर बॉम्ब टाकत अमेरिका-इस्त्रायलवर मोठा हल्ला केला आहे. इराणने हे हल्ले संयुक्त अरब अमिरातीच्या किनाऱ्यावर असलेल्या युद्धनौकांवर केले आहेत. तसेच इस्त्रायलच्या तेल अववीसह अनेक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. यामध्ये इस्त्रायलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इराणने इस्त्रायलसह कतारवर देखील हल्ले केले आहेत. मिसाईल, ड्रोन डागत इराणने कतारसह राजधानी दोहामध्येही हल्ले केले आहेत.

हल्ल्यात अमेरिकेची महत्त्वाची यंत्रणा नष्ट

इराणकडून अमेरिकेचे हवाई तळ असलेल्या देशातही हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर इराणने हल्ला केला आहे या हल्ल्यात अमेरिकेची महत्त्वाची यंत्रणा नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.

या हल्ल्याबाबत इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) स्पष्ट केले की, अमेरिकेच्या पाचव्या युद्धनौकेवर मोठा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेच्या महत्त्वाच्या यंत्रणा नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच अमेरिकेच्या कतारमधील अल उदैद हवाई तळाला, इराकमधील हरिर हवाई तळाला आणि कुवेतमधील अरिफजान तळांना टार्गेट करण्यात आले आहे, असा दावा IRGC ने केला आहे.

इराणने केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे आत्तापर्यंत 140 जवान जखमी झाले आहेत. तर 7 जवानांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध जवळपास संपले आहे, अशी घोषणा केली होती. तर त्यांच्या या वक्तव्यावर इराणने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. हे युद्ध कधी संपवायचे हे अमेरिका ठरवणार नाही तर ते आम्ही ठरवू, असा थेट इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे आता हे युद्ध थांबत असतानाच अचानक इराणने नवीन ठिणगी टाकल्याने हे युद्ध पुन्हा पेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) म्हटले की, या युद्धाचा शेवट कधी करायचा ते आम्ही ठरवू. अमेरिकेचे सैन्य हे युद्ध संपवू शकत नाही. कारण भविष्यातील परिस्थिती आणि राजकीय समीकरणे आमच्या सैन्याच्या हातात आहेत, असं इराणने म्हटलं आहे. इराणच्या या पवित्र्यामुळे अमेरिका पुन्हा आक्रमक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts