Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
गुन्हा

आयटी कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण, धर्मांतर करण्याचा प्रयत्न

IT Company Exploitation Case

IT Company Exploitation Case : नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत समोर आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाने आता अधिक भीषण वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला एका माजी कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीमुळे तपासाची व्याप्ती वाढली आहे. आरोपी हे केवळ काम करण्यासाठी नाही, तर त्यांचे ‘विशिष्ट मनसुबे’ पूर्ण करण्यासाठी सुटीनंतरही कंपनीत संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती समोर आली आहे…

धर्माच्या प्रसारासाठी जाळे विणण्यास सुरुवात

एसआयटीला संशय आहे की, मुख्य आरोपींनी 2022 पासूनच कंपनीत कट्टरतेचे विचार रुजवण्यासाठी आणि विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी जाळे विणण्यास सुरुवात केली होती. केवळ कामाच्या नावाखाली कंपनीच्या मालमत्तेचा आणि वेळेचा वापर करून काही महिला कर्मचाऱ्यांना मानसिक दबावाखाली ठेवले जात होते. तर आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी संशयित काम संपल्यावर घरी न जाता कंपनीत विशिष्ट हालचाली करायचे, अशी माहिती एका माजी कर्मचाऱ्याने एसआयटीला दिल्याची माहिती समोर येत आहे.

देशाबाहेरील संघटनांकडून फंडिंग

आता महिलांचे लैंगिक आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणाची तपासणी वेगाने सुरू आहे. संशयितांना देशाबाहेरील व्यक्ती / संघटनांकडून फंडिंग होते का? याबाबतचा तपास एसआयटीकडून सुरू सुरु आहे. तर कंपनीमधील संशयितांच्या बँक खात्यांची देखील एसआयटीकडून चौकशी केली आहे. तसेच ई-मेल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड, धमक्या यांची देखील तपासणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे….

78 ई-मेल्स तपासाच्या रडारवर

दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाची संशयित आणि कंपनीची एजीएम अश्विनी चैनानी हिच्या पोलीस कोठडीत नाशिक न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कंपनीच्या सर्व्हरवरून चैनानीला पाठवलेले 78 ई-मेल्स तपासाच्या रडारवर आहेत. हे ई-मेल्स पीडितांच्या तक्रारींचे होते की गुन्ह्याचा कट रचण्यासाठी, याचा शोध सुरू आहे. चैनानी आणि मुख्य संशयित तौसिफ अत्तार यांच्यात गेल्या दोन वर्षांत 38 वेळा संभाषण झाले आहे. दानिश शेख आणि रझा मेमन या संशयितांशीही ती नियमित संपर्कात होती. पीडितेने विनयभंगाची तक्रार केली असता, तिला मदत करण्याऐवजी “तुमको क्या हायलाईट होना है?” असे म्हणत चैनानीने तिचा आवाज दाबल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे..

लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या सदस्य

आश्विनी चैनानी या लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या सदस्य असतानाही 2023 पासून सुरू असलेल्या अत्याचारांकडे त्यांनी दुर्लक्ष का केले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पीडितेवर मानसिक दबाव टाकून तिला हतबल करण्यात चैनानी यांची मोठी भूमिका असल्याचा संशय बळावला आहे…

पुन्हा लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक शोषण

बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक शोषण, विनयभंग, संतती नसल्याबाबत तसेच वैवाहिक आयुष्याबद्दल बोलणे, बळजबरीने मांसाहार सेवन करायला लावणे, शरीरावरून अश्लील शेरेबाजी करणे आदी तक्रारी झाल्यानंतर पोलिसांनी आठ कर्मचाऱ्यांविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल केले. यातील एक पुन्हा लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक शोषण तर, पाच गुन्हे विनयभंग, धार्मिक भावना दुखावल्याशी संबंधित आहे.परजिल्ह्यातून नोकरीस आलेल्या युवकाच्या धर्मातराचाही प्रयत्न झाला. २०२२ ते २०२६ असे सलग चार वर्ष हे प्रकार सुरू होते. या प्रकरणांतील संशयितात नाशिकमधील सात आणि कंपनीच्या पुणे येथील मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुख महिला व्यवस्थापिकेचाही समावेश आहे. या सर्वांना कंपनीने निलंबित केलंय…

आठ संशयितांविरुद्ध एकूण नऊ गुन्हे

बहुराष्ट्रीय कंपनीतील विविध तक्रारींवरून आतापर्यंत आठ संशयितांविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सहा पुरूष तर दोन महिलांचा समावेश आहे. या प्रकरणातील सहा संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाची प्रमुख महिला व्यवस्थापिका पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणात संशयितांना साथ देणारी महिला फरार आहे. ती अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकलेली नाही. पोलीस पथकं सध्या तिच्या मागावर आहेत.. त्यामुळे या प्रकरणात अजून कोणत्या गोष्टी बाहेर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे..

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts