Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “मी जोसेफ विजय शपथ घेतो की…” विजयच्या मंत्रिमंडळातील ९ शिलेदार…
Top News

“मी जोसेफ विजय शपथ घेतो की…” विजयच्या मंत्रिमंडळातील ९ शिलेदार…

Joseph Vijay Tamil Nadu Cabinet

Joseph Vijay Tamil Nadu Cabinet : तमिळनाडूतील अनेक राजकीय घडामोडीनंतर आज अखेर जोसेफ विजयने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अन् ते तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदी विराजमन झाला. मात्र, त्यासोबत शपथ घेतलेल्या इतर नऊ शिलेदारांची देखील मोठी चर्चा सध्या सोशल मिडीयावर होताना दिसत आहे. या प्रमुख ९ शिलेदारांची माहिती देणारा हा स्पेशल आढावा घेणारा लेख….

१. के.ए. सेंगीट्टीयान

विजयच्या मंत्रिमंडळातील पहिलं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे के. ए. सेंगीट्टीयान. त्यांनी तामिळनाडूतील अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षात अनेक वर्ष काम केले आहे. ते अनेक वेळा तामिळनाडू विधानसभेवर निवडून आले असून, त्यांनी शालेय शिक्षण मंत्री म्हणूनही काम केले आहे. २०२४ नंतर त्यांनी विजयच्या पक्षात प्रवेश करून आता ते मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. पक्षातील अनुभवी आणि जेष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

२. अधव अर्जुन

विजयच्या मंत्रिमंडळातील दुसरं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे अधव अर्जुन. आधव अर्जुन हे तामिळनाडूतील एक अभ्यासू राजकारणी, राजकीय रणनीतिकार, परोपकारी आणि क्रीडा प्रशासक आहेत. अर्जून टीव्हीकेचे सचिव असून त्यांनी यंदाच्या निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन सांभाळत चेन्नईतील विल्लिवाक्कम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. अन् आता विजयच्या मंत्रिमंडळाचा भाग झाले.

३) बस्सी एन आनंद

विजयच्या मंत्रिमंडळातील तिसर महत्त्वाचं नाव म्हणजे ‘बस्सी’ एन. आनंद. ‘बस्सी’ एन. आनंद हे तामिळनाडूतील एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व असून, ते अभिनेते-राजकारणी सी. जोसेफ विजय यांचे निकटचे सहकारी आहेत. तसेच ते टीव्हीकेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते देखील आहेत. त्यांनी चेन्नईतील त्यागराया नगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि आता विजय यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.

४) के. जी.  अरुन राज

विजयच्या मंत्रिमंडळातील चौथ महत्त्वाचं नाव म्हणजे के. जी. अरुण राज होय. टीव्हीकेचे सरचिटणीस अरुण राज यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. तिरुतेनगोड विधानसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित झालेले आमदार अरुण राज हे माजी आयआरएस अधिकारी आहेत. त्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. प्रशासनातील माहिती आणि अभ्यासू चेहरा अशी त्याची ओळख आहे.

५. राजमोहन अरुमुगम

विजयच्या पाचव्या मंत्र्याचे नाव राजमोहन अरुमुगम आहे. राजमोहन अरुमुगम हे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळातील एक महत्त्वाचे नाव आहे. विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षात ते महत्त्वाची भूमिका बजावतात आहेत. ते ‘तमिळगा वेत्री कळघम’चे प्रचार सचिव आहेत. राजकारणात येण्यापूर्वी, ते एक प्रसिद्ध तमिळ अभिनेता, स्टँडअप कॉमेडियन, टेलिव्हिजन अँकर, प्रेरक वक्ता आणि कंटेंट क्रिएटर होते. राजमोहन हे या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या प्रमुख सदस्यांपैकी एक मानले जातात.

६. पी. वेंकटरमणन

विजय यांच्या मंत्रिमंडळातील सहावे शिलदार पी. वेंकटरमणन आहेत. वेंकटरमणन हे विजय यांच्या टीव्हीके पक्षाची कोषाध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. विजय यांचे जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ते २००० सालापासून ते विजय यांच्या राजकीय उपक्रमांशी निगडित आहेत आणि विजय फॅन्स असोसिएशन मध्ये सक्रिय राहिले आहेत. टीव्हीके पक्षाचे पडद्यामागील रणनीतिकार अशी देखील त्यांची ओळख आहे. TVK च्या ऑक्टोबर २०२४ मधील पहिल्या राज्य परिषदेत त्यांनीच कार्यकर्त्यांना शपथ दिली होती. त्यांनी चेन्नई जिल्ह्यातील मयिलापुर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय संपादन केला आणि आता मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

७. डॉ. टी. के. प्रभू

विजय यांच्या मंत्रिमंडळातील सातवे आणि सर्वात चर्चेत राहिलेलं नाव डॉ. टी. के. प्रभू. प्रभू यांनी कराईकुडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार एस. मंगुडी यांचा ४७ हजारांहून अधिक मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. डॉ. प्रभू हे व्यवसायाने दंतचिकित्सक आहेत. विजय यांच्या TVK पक्षातील डॉक्टर्स युनियन आणि युवा चेहऱ्यांपैकी ते एक प्रमुख नेते मानले जातात.

८) एस. कीर्तना

विजय यांच्या मंत्रिमंडळातील आठवी महिला शिलेदार कीर्तना या आहेत. मंत्रिमंडलातील महिला चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. सुरुवातीच्या काळात कीर्तना यांनी विजय यांच्या कोअर टीमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या केवळ २९ वर्षांच्या आहेत. एस. कीर्तना या तामिळनाडूतील सर्वात तरुण मंत्री आहेत. त्या अनेक भाषांमध्ये पारंगत आहेत. त्यांनी यापूर्वी डीएमके नेते एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय नेत्यांसोबत सल्लागार म्हणून काम केले आहे.

९) सीटीआर निर्मल कुमार

विजय यांच्या मंत्रिमंडळातील नववे शिलेदार सीटीआर निर्मल कुमार आहेत. ते टीव्हीके पक्षाचे सरचिटणीस असून सोशल मीडियासोबत पक्षाच्या डिजिटल प्रचाराची धुरा सांभाळली आहे. त्यांनी थिरुप्परंकुंड्रम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. निर्मल कुमार हे पूर्वी भाजप आणि एआयएडीएमके यांसारख्या मोठ्या पक्षांच्या आयटी विंगमध्ये कार्यरत होते. भाजपच्या आयटी विंगचे राज्य अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.ते एक कुशल डिजिटल रणनीतीकार मानले जातात. विजय यांच्या पक्षाला सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर भक्कम आधार तयार करून देण्यात त्यांची मोठी भूमिका आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts