Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • नराधम कांबळे घाणेरडी विकृती, शेळ्या अन् कोंबड्यांवरही अत्याचार
Top News

नराधम कांबळे घाणेरडी विकृती, शेळ्या अन् कोंबड्यांवरही अत्याचार

animal abuse case Kamble

animal abuse case Kamble : नसरापूर परिसरातील एका चिमुकलीवर भीमराव कांबळे याने पाशवी अत्याचार करून तिची जीवनयात्रा संपवली. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असली तरी, लोकांचा राग अनावर झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

75 वर्षीय वृद्ध माऊलीवरही बलात्कार

तपासातून समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या नराधमाने स्वतःच्या कुटुंबालाही आपल्या विकृतीचा बळी बनवले होते.नराधमाने यापूर्वी स्वतःच्या मुलीवर आणि पुतणीवरही अत्याचार केले होते. एका बापाने आपल्या मुलीसोबत असे कृत्य करणे, यावरूनच त्याच्या मानसिकतेची कल्पना येते. तपासादरम्यान समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या सैतानाने आपल्या स्वतःच्या मुलीलाही सोडले नव्हते. त्याने स्वतःच्या मुलीवर आणि पुतणीवरही अत्याचार केल्याचे जुने रेकॉर्ड आता समोर येत आहेत. एवढेच नाही तर, त्याने गावातील एका 65 वर्षीय महिलेवर आणि दुसऱ्या एका प्रकरणात 75 वर्षीय वृद्ध माऊलीवरही बलात्कार केला होता.

घाणेरड्या कृत्यांमुळे दिले होते गावातून हाकलून

भीमराव कांबळे हा मुळातूनच विकृत मानसिकतेचा होता. त्याच्या गावात राहणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या अशाच काही घाणेरड्या कृत्यांमुळे आणि गावकऱ्यांच्या सततच्या तक्रारींमुळे त्याला 20 वर्षांपूर्वीच गावातून हाकलून देण्यात आले होते. गावकऱ्यांनी त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते, परंतु तरीही त्याची ही विकृती कमी होण्याऐवजी वाढतच गेली.

शेळ्या आणि कोंबड्यांवरही केले होते अत्याचार

वासनांध भीमरावने केवळ महिला किंवा बालकांनाच लक्ष्य केले , तर मुक्या प्राण्यांनाही आपल्या वासनेचा विकृतीचा बळी बनवले होते. गावकऱ्यांनी पोलिसांना आणि प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या नराधमाने गावातील शेळ्या आणि कोंबड्यांवरही अत्याचार केले होते. एका माणसाची मानसिकता इतक्या खालच्या थराला जाऊ शकते, या विचारानेच सध्या संपूर्ण भोर तालुका हादरून गेला आहे. ज्याच्या मनात मुक्या प्राण्यांबद्दलही दया नव्हती, तो माणूस किती भयानक असू शकतो, याची प्रचिती यातून येते. त्याची ही ‘किळसवाणी’ प्रवृत्ती पाहून गावकऱ्यांनी त्याला अनेकदा हटकले होते, पण त्याच्यात सुधारणा झाली नाही.

समाजाने सुधारण्याची दिली संधी, चिमुकलीचा घेतला बळी

भीमराव हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी केलेल्या अशाच गंभीर गुन्ह्यांसाठी तो तुरुंगात होता. मात्र, 5 -6 वर्षांपूर्वी तो शिक्षा भोगून बाहेर आला. समाजाने त्याला सुधरण्याची संधी दिली, पण तुरुंगवास भोगूनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. उलट बाहेर आल्यावर त्याने अधिक क्रूरतेने एका लहान चिमुकलीचा बळी घेतला. सकुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच या उक्तीप्रमाणे त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा समाजासाठी घातक ठरेल असे कृत्य केले आणि एका चिमुकलीचा जीव घेतला.

नराधमाला लवकरात लवकर फाशीवर लटकवाण्याची मागणी

सध्या आरोपी भीमरावच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याच्या या कृत्यामुळे गावातील महिला आणि पालकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. हा माणूस समाजात राहण्याच्या लायकीचा नाही, याला लवकरात लवकर फासावर लटकवा, अशी संतप्त मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts