• Home
  • महाराष्ट्र
  • महिलांसाठी मोठी अपडेट! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना आणखी एक महिना? दुरुस्तीची मुदत आज संपणार; मेमध्ये ३००० रुपयांचा लाभ शक्य
Top News

महिलांसाठी मोठी अपडेट! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना आणखी एक महिना? दुरुस्तीची मुदत आज संपणार; मेमध्ये ३००० रुपयांचा लाभ शक्य

ladki bahin yojna

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अद्याप ई-केवायसी न केलेल्या महिलांना आणखी एक महिन्याची मुदत मिळण्याची शक्यता आहे. चला, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या खास लेखातून.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थाना आता ई-केवायसी’ करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्यापही अनेक महिलांनी ‘ई- केवायसी’ पूर्ण केलेली नाही. अशा महिलांना आणखी एक महिना मुदत देण्याचा विचार सुरू असून याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्त मंगळवारी महिला व बालविकास अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा: ग्रहांचा दुर्मिळ महासंयोग! मे महिन्यात या 3 राशींच्या लोकांचे नशीब पलटणार; अचानक होणार धनवर्षाव

महाराष्ट्रातील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. १ जुलै २०२४ पासून या सर्व महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत होते. पुढे फेब्रुवारी २०२५ पासून पात्रतेची पडताळणी सुरू झाली आणि त्यानुसार सुमारे दोन लाख महिलांची लाभ थांबवण्यात आला. लाभ सुरू ठेवण्यासाठी ‘ई- केवायसी’ अनिवार्य करण्यात आली आहे.

सुरुवातीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, नंतर ती वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांनाही काही काळ लाभ मिळत राहिला. त्यामुळे अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले. राज्यभरात अंदाजे १७ लाख महिलांची ‘ई-केवायसी’ अद्याप बाकी आहे.

दरम्यान, काही महिलांनी ‘ई-केवायसी’ केली असली तरी त्यात त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे त्या अपात्र ठरू नयेत म्हणून दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, जी आज संपत आहे.

ही योजना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरली होती. राज्यभरातील अडीच कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केला होता आणि सुरुवातीला सर्वांनाच लाभ मिळाला. मात्र, आता मोठ्या संख्येने महिलांचा लाभ थांबवणे सरकारसाठी राजकीयदृष्ट्या अवघड ठरू शकते. त्यामुळे ‘ई-केवायसी’साठी आणखी एक संधी दिली जाईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts