• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम; आता बायोमेट्रिक हजेरी आणि सीसीटीव्ही देखरेख अनिवार्य
ताज्या बातम्या

अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम; आता बायोमेट्रिक हजेरी आणि सीसीटीव्ही देखरेख अनिवार्य

11th 12th Students New Rules 1

11th 12th Students New Rules: कॉलेज बुडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता प्रशासनाची नजर असणार आहे. त्यामुळे सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना कठोर अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहे.

राज्यातील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदापासून उपस्थितीबाबत कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी नियमितपणे महाविद्यालयात उपस्थित राहावे यासाठी शिक्षण विभागाने बायोमेट्रिक हजरे आणि सीसीटीव्ही देखरेख अनिवार्य करण्यात निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे.

हेही वाचा: देशभरात इंधन दरवाढीचा भडका; काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू

सध्या अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू असून जुलैअखेर वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी बारावीचे वर्ग १५ जूनपासून सुरु होणार आहेत. अनेक विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसला प्राधान्य देत महाविद्यालयात अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

नवे नियम

नव्या नियमानुसार प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक राहणार आहे. या कॅमेऱ्यांतील रेकॉर्डिग सुरक्षित ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज बायोमेट्रिक मशीनवर हजेरी नोंदवावी लागणार आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची अचूक नोंद ठेवणे शक्य होणार आहे.

शिक्षण विभागाकडून आदेश

शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांच्या कार्यपद्धतीवरही लक्ष ठेवले जाणार आहे. कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयाचा खासगी कोचिंग क्लासेससोबत करार किंवा संबंध आहे का, याची गोपनीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच महाविद्यालयांनी आपला यू-डायस क्रमांक आणि मान्यता प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहणार आहे.

सीसीटीव्हीद्वारे लक्ष

दररोज वर्गातील उपस्थितीवर मुख्यध्यापकांना सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवावे लागणार असून त्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीवर नियंत्रण येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts