Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • लक्ष द्या विद्यार्थ्यांनो! अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Top News

लक्ष द्या विद्यार्थ्यांनो! अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

11th admission

Maharashtra FYJC Admission 2026 अंतर्गत इयत्ता अकरावी (२०२६-२७ साठीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. ही प्रक्रिया १० एप्रिलपासून सुरू झाली असून ३० एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.

इयत्ता अकरावी (२०२६-२७ साठीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. ही प्रक्रिया १० एप्रिलपासून सुरू झाली असून ३० एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.

राज्यातील हजारो विद्यार्थांनी आधीच नोंदणी केली असून आतापर्यंत सुमारे 2.7 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. तरीही अनेक विद्यार्थी नोंदणीपासून वंचित राहू नयेत म्हणून शिक्षण विभागाने आवाहन केले आहे.

हेही वाचा: तयारीला लागा! CBSE 10वी दुसऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता पेपर

शेवटची तारीख लक्षात ठेवा

नोंदणीची अंतिम मुदत 30 एप्रिल सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी तत्काळ अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

ऑनलाइन नोंदणी अनिवार्य

अकरावी प्रवेशासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच केली जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने अर्जाचा पहिला भाग या कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

नोंदणी कशी करावी?

अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://mahafyjcadmissions.in/
“Student Registration” या पर्यायावर क्लिक करा
आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा
स्वतःचा पासवर्ड तयार करा
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सुरक्षित ठेवा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts