• Home
  • मनोरंजन
  • अभिनेत्री वर्षा उसगांवकर अडचणीत, थेट पोलीस ठाण्यात घेतली धाव, नेमकं कारण काय?
ताज्या बातम्या

अभिनेत्री वर्षा उसगांवकर अडचणीत, थेट पोलीस ठाण्यात घेतली धाव, नेमकं कारण काय?

varsha usgaonakr
80

Varsha Usgaonkar | प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) या अडचणीत सापडल्या असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. वर्षा उसगांवर यांना लाखो रूपयांचा गंडा बसला आहे. त्यांची लाखो रूपयांची फसवणूक झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – भारताची बॅडमिंटनपटू अन् अभिनेत्री अडकली दुबईत; सांगितली युद्धाची भयानक परिस्थिती, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

वर्षा उसगांवकरांना लाखो रूपयांचा गंडा

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा उसगांवकर यांची 47 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. यानंतर वर्षा उसगांवकरांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी दिग्दर्शक आणि बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मृणालीनी सुभाष जांभळे ही एक अभिनेत्री असून तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर संशयित आरोपी अविनाश जाधव यांच्यातोसबत मृणालीची ओळख होती. या ओळखीतून अविनाश जाधव यांनी तिला आपण दिग्दर्शक आणि बिल्डर असल्याचं सांगितलं होतं. तसेच डोंबिवलीतील प्रकल्पात गुंतवणूक केली तर अधिक परतावा देईन, असं आश्वासन जाधव यांनी मृणालीनीला दिले होते.

दुसरीकडे, मृणालीनी तिच्या ओळखीने वर्षा उसगांवकर आणि त्यांच्यासह आणखी तीन जणांनी मिळून चेक, ऑनलाईन व्यवहाराद्वारे सुमारे 47 लाखांची गुंतवणूक जाधव यांच्याकडे केली. या गुंतवणूकीनंतर जाधव यांनी सुरूवातीला सर्वांना काही पैसे परतावा म्हणून दिले. पण, त्यानंतर काही काळाने त्याने परतावा देणं बंद केलं. परतावा देणं बंद केल्यानंतर वर्षा उसगांवकर आणि मृणालीनी यांनी जाधवला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानं कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि आपला मोबाईल क्रमांक बदलत राहिला.

यानंतर सर्व तक्रारदारांनी जाधवला डोंबिवलीत पकडले आणि पैशांची विचारणा केली. यावर त्याने मी पैसे देणार नाही, काय करायचं ते करा, असे अरेरावीच्या शब्दांत उत्तर दिले, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. दरम्यान, पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts