• Home
  • ताज्या बातम्या
  • MIT कॅम्पसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! लेकीचा छळ करणाऱ्या हुल्लडबाजाला पालकांनी कॅम्पसमध्येच लोळवले
Pune

MIT कॅम्पसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! लेकीचा छळ करणाऱ्या हुल्लडबाजाला पालकांनी कॅम्पसमध्येच लोळवले

Parents thrash a hooligan in the campus

MIT ADT University : विद्येचे माहेरघर असलेले पुणे सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेच्या केंद्रस्थानी येताना दिसत आहे. पुणे शहराची शिक्षणापेक्षा इतर गोष्टींसाठीच जास्त बदनामी होताना दिसून येत आहे. शहरातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT University) विद्यापीठाच्या आवारात एक संतापजनक घटना घडली. येथील एका विद्यार्थिनीची छेड (Teasing a student) काढल्याने पालकांनी विद्यार्थ्यांला चांगलेच चोपल्याचे पाहायला मिळाले. गेल्या १५ दिवसांपासून एका तरुणीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजच्या विद्यार्थ्याला पालकांनी कॅम्पसमध्येच गाठले आणि जाब विचारला.

हेही वाचा – उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब देत लोणावळा नगरपरिषद अध्यक्षांचा अनोखा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनीला गेल्या १५ दिवसांपासून एक विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून त्रास देत होता. वारंवार होणाऱ्या या छळामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थिनीने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. मुलीसोबत घडणारा प्रकार ऐकून पालकांचा संताप अनावर झाला. त्यांनी आरोपी मुलाला धडा शिकवायचे ठरवले. ते आपल्या मुलीसोबत कॉलेजला आले.

यावेळी संबंधित हुल्लडबाज विद्यार्थी पुन्हा या कॉलेज परिसरात आला. मुलीची छेड काढताना पालकांनी त्याला रंगेहाथ पकडले. सुरुवातीला पालकांनी त्याला समजावण्याचा आणि जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या विद्यार्थ्याने उद्धटपणा केल्याने पित्याचा संयम सुटला. संतापलेल्या पालकांनी त्या हुल्लडबाजा विद्यार्थ्याला कॅम्पसमध्येच लोळवले आणि चांगलाच चोप दिला.

धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकाराबाबत पीडित कुटुंबाने आधीच विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, इतके दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप केला जात आहे. विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडून प्रशासन कोणत्या घटनेची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल आता पालक विचारत आहेत. बाहेरील कॉलेजचा विद्यार्थी कॅम्पसमध्ये येऊन मुलींची छेड काढतोच कसा असा सवाल उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts