Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्ल घात केला… एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू कसा झाला? जाणून घ्या एका क्लिकवर
ताज्या बातम्या

आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्ल घात केला… एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू कसा झाला? जाणून घ्या एका क्लिकवर

Mumbai Pydhonie News 1

Mumbai Pydhonie News : सध्या कोणासोबत कधी काय होईल याचा काहीच भरवोसा राहिला नाही. असाच एक प्रकार मुंबईतील पायधुनी कुटुंबासोबत घडला आहे. कुुटुंबातील चार सदस्यांनी रात्री जेवण करताना आधी चिकन बिर्याणी खाल्ली अन् काही वेळाने कलिंगड खाल्ले. त्यानंतर मध्यरात्री त्यांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील काही तासांत बिर्याणी आणि कलिंगड खाल्लाने घात झाला. त्यामुळे माणसाचा कधी काय होईल म्हण सध्या तरी लागू होताना दिसून येत आहे. मात्र, नेमकं या कुुटुंबासोबत काय घडलं, अन् त्यांचा घात कसा झाला, तेच या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटूंबातील चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्राथामिक माहितीनुसार, कुटूंबाने रात्री उशिरा बिर्याणी खाल्यानंतर काही वेळातच कलिंगड खाल्याचे सांगितले. त्यानंतर काही तासांतच सर्वाना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा समावेश असून त्यांना तातडीने जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.

हेही वाचा: नात्याला काळिमा! दिराकडून वहिनीची निर्घृण हत्या, मुलीसमोरच घडला प्रकार

नेमकं काय घडलं?

घटनेच्या रात्री नेमकं काय घडलं याबाबत नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुटूंबाने रात्री उशिरा बाहेरून आणलेली बिर्याणी खाल्ली होती. घरी परतल्यानंतर काही वेळाने मुलांना भूक लागल्याने कलिंगड खाण्यात आले. यानंतर मध्यरात्रीपासूनच सर्वांची तब्येत बिघडू लागली आणि पहाटेच्या सुमारास प्रकृती गंभीर झाली.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विषबाधेचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी कलिंगड विक्रेत्याची चौकशी सुरू केली असून अन्नाच्या नमुन्यांसह व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

अधिकृत अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts