• Home
  • राजकारण
  • काँग्रेस हा पक्ष छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारा भुरटे चोर आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
Top News

काँग्रेस हा पक्ष छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारा भुरटे चोर आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar on Congress

Prakash Ambedkar on Congress : सध्या राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच नेते प्रचारात व्यक्त आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससह भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते अकोल्यातील जाहीर सभेत बोलत होते. काँग्रेस हा पक्ष छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारा भुरटा चोर आहे. तर भाजपवाले हे मोठा दरोडा टाकणारे डाकू आहेत, असं आंबेडकर यांनी म्हणलं आहे. भाजपवाले अख्खं दुकानच लुटून नेतात त्यामुळे डाकूंच्या सत्तेला पूर्णविराम देण्याचं आवाहन आंबेडकरांनी केल आहे. प्रकाश आंबेडकर हे वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवणी गावातील प्रचारसभेत बोलत होते. ही शेवटची निवडणूक आहे, त्यामुळे या निवडणुकीत भाजपचं कंबरडं मोडा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना केलंय.

हेही वाचा – जिल्हा परिषद, पंचायत समितीचा धुराळा उडणार, आज निवडणूक आयोग करणार घोषणा..

सध्या राज्यात सरकार अधिकृत गुंडगिरी चालू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अकोल्यात मतदारांचे प्रभाग जाणिवपूर्वक बदलल्याचा आरोपही त्यांनी केला आणि एमआयएमची भाजपसोबतची युती मुस्लिमांना रुचली नसल्याचं आंबेडकरांनी यावेळी म्हटलं आहे. आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की, भाजपाचे कंबरडे मोडले तर त्यांचा सत्तेत जाण्याचा मार्ग बंद होईल. मी म्हणतो की, काँग्रेसवाले भूरटे चोर आहेत. कुठ सामान चोर दुकानातले, कुठे पैसे चोर, कुठे पाच रूपयांचे बिकिस्टचे पाकिट चोरणारे भुरटे चोर आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.

 

बीजेपीवाले डाकू आहेत हे लक्षात ठेवा. बीजेपीवाले डाकू आहेत आणि ते अख्खे दुकानच लुटतात. दुकानातला माल शिल्लकच ठेवत नाहीत. त्यामुळे या डाकूंच्या सत्तेला कुठेतरी पूर्णविराम देण्याची गरज आली आहे, हे लक्षात घ्या आणि तो पूर्णविराम तुमच्याशिवाय दुसरे कोणीच देऊ शकत नाही, हे देखील लक्षात घ्या. परिस्थिती अत्यंत बिकड आहे हे लक्षात ठेवा, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. 

ही कदाचित शेवटची निवडणूक आहे

पोलिस खात्यामधील चर्चा मी आपल्याला सांगतो. पोलिस खातं असं म्हणत आहे की, ही कदाचित शेवटची निवडणूक आहे. तुम्हाला आता ही शेवटची निवडणूक करायची आहे का? हा प्रश्न उपस्थित जनतेला प्रकाश आंबेडकर विचारताना दिसले. यावर लोक नाही म्हटले. आंबेडकर पुढे म्हणाली की, का शेवटी निवडणूक करायची नाही ते सांगा. या प्रचारसभेत भाजपाला प्रकाश आंबेडकरांनी थेट डाकू म्हटल्याने जोरदार चर्चा रंगताा दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts