• Home
  • महाराष्ट्र
  • तब्बल दोन लाखाची लाच स्वीकारताना तीन पोलीस कर्मचारी ACB च्या जाळ्यात; IG दत्तात्रय कराळे धुळे दौऱ्यावर
Top News

तब्बल दोन लाखाची लाच स्वीकारताना तीन पोलीस कर्मचारी ACB च्या जाळ्यात; IG दत्तात्रय कराळे धुळे दौऱ्यावर

ACB arrests three police personnel in Rs 2 lakh bribery case

police bribery case ACB : धुळे जिल्ह्यात लाचखोरीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे. तक्रारदाराकडून तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती दोन लाख रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य करून ही रक्कम स्वीकारताना पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पावरा यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

काय हे प्रकरण

या प्रकरणात पोलीस हवालदार भूषण रामोळे, पोलीस कॉन्स्टेबल धनराज माळवे, किरण सोनवणे यांचाही सहभाग असल्याचा आरोप असून, सर्व आरोपी थाळनेर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. तक्रारदाराविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही लाच मागितल्याची माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी ही कारवाई केली असून, संबंधित आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

हे ही वाचा : मांजा दोऱ्यामुळे ७ वर्षाच्या मुलाचा कापला गळा, दुचाकीवरून जाताना घडली घटना

सध्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था, बंदोबस्त आणि संवेदनशील अशा भागांचा आढावा घेण्यासाठी आयजी दत्तात्रय कराळे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा अत्यंत सतर्क असून अशातच ACB ने केलेल्या कारवाई केली आहे.

सापळा रचून कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार दाखल करण्यात आलेल्या जुन्या एका गुन्ह्यात वडिलांना अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून थाळनेर पोलीस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांनी 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. एवढेच नाही तर तडजोडीनंतर 2 लाख रुपये देण्याचे ठरले होते. हे संपूर्ण प्रकरण एसीबीकडे दाखल झाले होते. त्यानंतर शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts