• Home
  • ताज्या बातम्या
  • अनैतिक संबंधातून भीषण खून; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला अटक; कोण आहे तो?
गुन्हा

अनैतिक संबंधातून भीषण खून; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला अटक; कोण आहे तो?

Pune Crime

Pune Murder Case: पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, वकील पतीच्या कथित प्रेमसंबंधाच्या संशयातून पत्नीने नवऱ्याच्या ऑफिसमधल्या एका महिलेला ठार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या ६ तासांत तिघांना अटक केली आहे.

वकील पतीच्या कथित प्रेमसंबंधाच्या संशयातून पत्नीने नवऱ्याच्या ऑफिसमधल्या एका महिलेला ठार केल्याचे समोर आले आहे. मृत महिलेचे नाव पूनम दिनेश मुन (वय ३५) असे असून त्या येरवडा परिसरातील रहिवासी होत्या. या प्रकरणातील आरोपी स्वाती संजय सावंत, तिची मुलगी आणि वकील संजय दत्तात्रय सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: स्मरणशक्ती वाढवायची आहे? सकाळच्या नाश्त्यात प्या हे सुपर हेल्दी ड्रिंक; लगेच लिहून घ्या रेसिपी

संशयातून उभा राहिला कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वाती सावंत हिला तिच्या पती संजय सावंत आणि पूनम मुन यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून संतापाच्या भरात तिघांनी मिळून पूनम मुन यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे.

ही घटना १६ एप्रिल दुपारी २ ते १७ एप्रिल सकाळी ११ या दरम्यान चंदननगर परिसरातील जुन्या मुंढवा रोडवरील अ‍ॅड. सावंत यांच्या कार्यालयात घडली.

कार्यालयातच निर्घृण हत्या

आरोपींनी पूनम मुन यांचे हातपाय बांधून त्यांच्यावर लोखंडी वस्तू आणि धारदार शस्त्राने वार करत त्यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह लपवण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पूनम मुन घरी परत न आल्याने त्यांच्या पतीने शोध सुरू केला असता हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना धक्कादायक दृश्य दिसले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

६ तासांत आरोपी अटक

या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक तपास आणि जलद कारवाई करत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत तिघा आरोपींना अटक केली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे.

राजकीय कनेक्शनचा आरोप

आरोपी संजय सावंत हा एका राजकीय पक्षाच्या कायदा आघाडीचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहपोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts