Oily Skin Care Tips | सध्या कडक उन्हाळ्याचे (Summer) दिवस सुरू आहेत. मग उन्हाळा आला की तो तेलकट त्वचा (Oily Skin) असलेल्यांसाठी एक आव्हानच ठरतो. तीव्र उष्णता, घाम आणि वाढलेले तेल उत्पादन यामुळे त्वचा तेलकट होते. त्वचा तेलकट झाल्यामुळे मुरूमे, ब्लॅकहेड्स, उघडी छिद्रे आणि निस्तेजपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. तर तुम्ही देखील तेलकट त्वचेमुळे हैराण झाले आहात का? जर तुम्हालाही ही समस्या त्रास देत असेल तर त्वचेची योग्य काळजी घेऊन तुम्ही अतिरिक्त तेल नियंत्रित करू शकता आणि तुमची त्वचा ताजीतवानी व निरोगी ठेवू शकता. चला तर मग उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स जाणून घेऊया.
हेही वाचा – परदेशात लग्न करताय, भारतात जागा नाही का? डेस्टिनेशन वेडिंगवर PM मोदींचा थेट सवाल
तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी सोप्या टीप्स
चेहरा दिवसातून दोनदा स्वच्छ करा – उन्हाळ्यात तुमची त्वचा लवकर तेलकट होत असते. त्यामुळे प्रत्येकाने दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ केला पाहिजे. तेलकट त्वचेसाठी चेहरा स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चेहऱ्यावरील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी दिवसातून किमान दोनदा सौम्य, तेल-विरहित क्लीन्झरने चेहरा धुवा.
आठवड्यातून दोनदा स्क्रबिंग करा – तेलकट त्वचेवर मृत पेशी लवकर जमा होतात ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. तर स्क्रबिंग केल्यामुळे या पेशी निघून जातात आणि नवीन त्वचा दिसू लागते. मृत त्वचा आणि घाण काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा गुळगुळीत होते आणि त्वचेची छिद्रे बंद होण्यास प्रतिबंध होतो.
सनस्क्रीन वापरा – उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तेल-विरहित सनस्क्रीन वापरा. ते तुमच्या त्वचेला अतिनील किरणांपासून वाचवते आणि उन्हामुळे त्वचा जळणे व वृद्धत्वाची चिन्हे दिसणे टाळते.
गुलाबजल – गुलाबजल नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. ते त्वचेचा pH संतुलित करते, त्वचेची छिद्रे घट्ट करते आणि तेलकटपणा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही चंदन पावडरमध्ये गुलाबजल मिक्स करून ते चेहऱ्याला लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.












