• Home
  • महाराष्ट्र
  • वर्ध्याचे सुपुत्र शहीद: ITBP जवान सुरेंद्र बाबारावजी कुंभरे यांना वीरमरण
ताज्या बातम्या

वर्ध्याचे सुपुत्र शहीद: ITBP जवान सुरेंद्र बाबारावजी कुंभरे यांना वीरमरण

ITBP Jawan Surendra Babaravji Kumbhare from Wardha attains martyrdom

ITBP Jawan Surendra Kumbhare martyrdom : वर्धा जिल्ह्यातील चिंचोली डांगे तालुका आर्वी येथील रहिवाशी तथा इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) मधील जवान सुरेंद्र बाबारावजी कुंभरे हे देशसेवेत शहीद झाले. त्यांच्या शहादतीमुळे वर्धा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

सुरेंद्र कुंभरे यांची सन 2007 मध्ये सैन्यात भरती झाली होती. त्यांनी देशाच्या सीमांचे रक्षण करत दीर्घकाळ प्रामाणिक सेवा बजावली. ते 2026 मध्ये सेवानिवृत्त होणार होते. सध्या ते ITBP या युनिटमध्ये कार्यरत होते. नोव्हेंबर महिन्यात ते एक महिन्याच्या सुट्टीवर घरी आले होते. उपचारासाठी दवाखान्यात भरती असताना 31 डिसेंबर रोजी त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी फोनवर शेवटचा संवाद साधला, अशी भावनिक माहिती कुटुंबीयांनी दिली.

हे ही वाचा : भाजपच्या ट्रोलिंगला बळी पडून पूजा मोरे यांनी उमेदवारी घेतली मागे; अश्रू अनावर

शहीद सुरेंद्र कुंभरे यांच्या पश्चात 8 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांची मुलगी, तसेच कुटुंबीय असा परिवार आहे. शहीद जवान सुरेंद्र कुंभरे यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, ITBP च्या 38 बटालियन (खरोसा, जिल्हा रायपूर, छत्तीसगड) येथील सलामी गार्ड तसेच वर्धा पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts