Breaking News :
लाईफस्टाईल

Double Income, No Kids! DINK म्हणजे काय? तरुण जोडपी पालकत्वाचा निर्णय का टाळतायत?

What Is Dink Meaning
7
What Is Dink Meaning: दोघेही कमवतात, चांगलं आयुष्य जगतात; पण मुलं नकोत! ‘DINK’ ही संकल्पना सध्या तरुण जोडप्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं DINK म्हणजे काय? पालकत्वापेक्षा करिअर, पैसा आणि स्वतःचं आयुष्य का निवडतात ही जोडपी? जाणून घ्या या नव्या Lifestyle Trend मागचं कारण…

लग्न, नोकरी, घर आणि मग मुलं… आयुष्याचा हा पारंपरिक क्रम आता अनेक तरुण जोडप्यांना तितकासा (DINK lifestyle) ठरलेला वाटत नाही. करिअर, आर्थिक स्वातंत्र्य, प्रवास आणि स्वतःसाठी वेळ यांनी प्राधान्य देणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढताना दिसतेय. याच बदलत्या विचारसरणीतून DINK ही संकल्पना पुन्हा चर्चेत आली आहे

DINK म्हणजे नेमकं काय?

DINK म्हणजे Double Income, No Kids. सोप्या भाषेत सांगायचं तर, या जोडप्यात नवरा- बायको (DINK couples) दोघेही कमवतात, मात्र ते मुलं न होण्याचा निर्णय घेतात. काही जोडपी हा निर्णय कायमस्वरूपी घेतात, तर काहींसाठी हा निर्णय काही वर्षांसाठी असू शकतो. म्हणजेच, DINK चा अर्थ केवळ “मुलं नकोत” एवढाच नाही. तर आपल्या आयुष्याशी दिशा आणि प्राधान्यक्रम स्वतः ठरवण्याची निवड असाही त्याकडे पाहता येतो.

हेही वाचा: परीक्षा नाही, मेरिटवर होणार निवड! इंडियन ऑईलमध्ये 433 अप्रेंटिस पदांची भरती; कोणाला करता येणार अर्ज?

DINK म्हणजे पालकत्वाचा कायमचा नकार?

असं आवश्यक नाही. तर, काही जोडपी सध्या मुलं न करण्याचा निर्णय (young couples no kids) घेतात आणि भविष्यात परिस्थितीनुसार निर्णय बदलू शकतात. त्यामुळे प्रत्येक DINK जोडप्याचा दृष्टिकोन सारखा असेलच असं नाही. काहींसाठी हा कायमस्वरूपी निर्णय असतो, तर काहींसाठी तो “आत्ता नाही” असा निर्णय असतो.

भारतात हा ट्रेंड का चर्चेत येतोय? (changing family trends)

भारतात कुटुंब आणि पालकत्वाला पारंपरिक पद्धतीने मोठं महत्त्व दिलं जातं. त्यामुळे लग्नानंतर मुलं होणं ही पूर्वी जवळपास निश्चित मानली जाणारी गोष्ट होती.

मात्र शहरी तरुणांमध्ये शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, करिअरच्या संधी आणि जीवनशैलीतील बदलांमुळे या पारंपरिक चौकटीबाबत प्रश्न विचारले जात आहेत.

“लग्न झालं म्हणजे मुलं झालीच पाहिजेत का?”
“पालकत्वाचा निर्णय समाजासाठी की स्वतःसाठी?”
“आर्थिक स्थैर्य आधी की कुटुंबाचा विस्तार?”

असे प्रश्न आता उघडपणे चर्चिले जात आहेत.

DINK Lifestyle चे फायदे काय?

DINK जीवनशैली निवडणाऱ्या जोडप्यांना काही संभाव्य फायदे मिळू शकतात:

दोघांच्याही उत्पन्नातून अधिक बचत करण्याची संधी
करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची मुभा
प्रवास आणि वैयक्तिक आवडींसाठी अधिक वेळ
आर्थिक निर्णयांमध्ये अधिक स्वातंत्र्य
दैनंदिन आयुष्यात अधिक लवचिकता

मात्र यासोबत सामाजिक दबाव, कुटुंबीयांची अपेक्षा आणि भविष्यातील भावनिक किंवा वैयक्तिक गरजा यांचाही विचार करावा लागतो.

शेवटी मुद्दा DINKचा नाही, निवडीचा आहे!

DINK हा फक्त एक ट्रेंडिंग शब्द नाही. तो आयुष्य कसं जगायचं, कधी पालक व्हायचं किंवा पालक व्हायचंच का, याबाबत व्यक्ती आणि जोडप्यांना स्वतःचा निर्णय घेण्याच्या बदलत्या मानसिकतेचं उदाहरण आहे.

कोणाला मुलांसह कुटुंब हवं असेल, तर कोणाला मुलांशिवाय आयुष्य जगण्यात समाधान वाटू शकतं. दोन्ही निवडींचे फायदे-तोटे आहेत.

शेवटी, DINK असो किंवा पालकत्वाचा निर्णय असो महत्त्वाचं हेच की तो निर्णय समाजाच्या दबावामुळे नव्हे, तर दोघांच्या संमतीने आणि विचारपूर्वक घेतलेला असावा.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts