• Home
  • राजकारण
  • “गेट आऊट ऑफ हिअर…” वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या महिलेनं मंत्र्याला झापलं
Top News

“गेट आऊट ऑफ हिअर…” वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या महिलेनं मंत्र्याला झापलं

traffic jam woman scolds minister

traffic jam woman scolds minister : भारतीय जनता पार्टीने (BJP) लोकसभेत महिला आरक्षण (Woments Reservation) घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर (Bill rejected) झाल्याच्या निषेधार्थ मुंबईतील वरळी डोम येथे ‘जन आक्रोश महिला संमेलन’ आयोजित केले होते. मात्र, या आंदोलनामुळं झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या एका महिलेनं थेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनाच खडेबोल सुनावलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral Vidio) चांगलाच व्हायरल होत आहे.

वाहतूक कोंडीमुळे महिलेचा संयम सुटला

भाजपाच्या या मोर्चामुळे वरळी आणि परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे एका महिलेचा संयम सुटला. तिने थेट मोर्चाच्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला आणि समोर असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. “विरोध करायचा असेल तर मैदानात करा, लोकांना ट्रॅफिकमध्ये का अडकवता?” असा थेट सवाल करत “गेट आऊट ऑफ हिअर…” म्हणत वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या महिलेनं मंत्री महोदयांना सर्वांसमोरच झापलं. यावेळी पोलीस आणि महिला आंदोलकांमध्येही शाब्दिक चकमक उडाली. वाहतूक कोंडीचा फटका बसलेल्या एका महिलेने थेट मंत्री गिरीश महाजन यांनाच खडेबोल सुनावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देशातील महिला भाजपला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही – सपकाळ

“महिला आरक्षणाच्या नावाखाली खोटे नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा या धाडसी भगिनीने उघडा पाडला आहे. महिलांचा केवळ राजकीय साधन म्हणून वापर करणाऱ्या भाजपचा संविधान बदलण्याचा डाव ‘इंडिया’ आघाडीने याआधीच हाणून पाडला होता. आज केवळ एका मंत्र्याला सुनावले आहे, पण येणाऱ्या काळात देशातील महिला भाजपला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपा भगाओ, देश बचाओ!”, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

आंदोलनाचे कारण खोटे असेल तर लोक अशीच फजिती करतात – रोहित पवार

या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “केवळ ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ला खूष करण्यासाठी लोकांना तीन-तीन तास वेठीस धरणे चुकीचे आहे. आंदोलनाचे कारण खोटे असेल तर लोक अशीच फजिती करतात,” असे ट्विट पवारांनी केले आहे. तसेच, संबंधित महिलेवर कारवाई न करता सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts