• Home
  • महाराष्ट्र
  • क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी! घर-ऑफिसच्या जबाबदाऱ्यांपलीकडे महिलांची बॅटिंग!
Top News

क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी! घर-ऑफिसच्या जबाबदाऱ्यांपलीकडे महिलांची बॅटिंग!

Women Cricket Empowerment

Women Cricket Empowerment : क्रिकेट म्हटलं की आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर गल्लीत खेळणारी मुलं किंवा मोठ्या मैदानावर खेळणारे तरुणच उभे राहतात. मात्र कोपरगावच्या के.बी.पी. विद्यालयाच्या मैदानावर सध्या एक वेगळंच, प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. घरातील जबाबदाऱ्या आणि कार्यालयीन कामाचा व्याप सांभाळत महिलांनी थेट क्रिकेटच्या मैदानात उतरण्याचा निर्धार केला असून, त्यांच्या सरावाने शहरात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येत असून यामध्ये महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा देखील आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे कोपरगाव येथील शिक्षिका व पंचायत समितीच्या महिला कर्मचारी क्रिकेटचा सराव करताना दिसत आहे.ग्रामीण भागात महिलांचा मैदानी खेळात सहभाग दुर्मिळ मानला जातो. पण कोपरगावातील शिक्षिका, पंचायत समितीतील महिला कर्मचारी आणि स्थानिक महिला हे सर्व समज खोटे ठरवत आहेत. संध्याकाळी वेळ काढत या महिला नियमित क्रिकेट सराव करत असून, बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये त्यांचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येतो.

हेही वाचा – भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्लेक्स लावण्यावरुन हाणामारी, दोन्ही गटांवर गुन्हे

आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी खेळ अत्यंत गरजेचा

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ तरुणीच नव्हे, तर विविध वयोगटातील महिला सहभागी आहेत. “खेळायला वयाचं बंधन नसतं,” हेच जणू त्या सिद्ध करत आहेत. मैदानावर धावणं, झेल पकडणं आणि अचूक चेंडू टाकणं यामध्ये या सर्वजणी कोणाच्याही तोडीस तोड ठरत आहेत.’कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी खेळ अत्यंत गरजेचा आहे. महिलांनी अशा पद्धतीने मैदानात उतरणे ही काळाची गरज असून, कोपरगावातून याची सुरुवात होणे अभिमानास्पद आहे,’ असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts